शेवग्याच्या शेंगेच्या सेवनाने गरोदरपणात आणि इतर वेळी होणारे आरोग्यदायी फायदे…..
शेवग्यची शेंगांचा आहारातील समावेश हा गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर उपयुक्त ठरतो. तसेच इ शेवग्याच्या शेंगेचा आहारात समावेश केल्याने इतर देखील अनेक आरोग्यविषयक फायदे होतात.
१. गरोदर असताना होणारा त्रास…
गर्भावस्थेत दरम्यान होणार्या आळसाला शेवग्याने कमी करता येत. ह्या शेंगा उलटी आणि चक्कर यासारखे त्रास कमी करते
२. गरोदपणातील मधुमेहावर गुणकारी…
शेवग्याच्या शेंग्यांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. परिणामी मधूमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच गरोदपणात होणाऱ्या मधुमेहावर गुणकारी

३. प्रसूतीनंतरचा त्रासावर उपयुक्त…
सुकर प्रसुतीसोबतच गर्भारपणाच्या काळातील आणि प्रसुतीनंतरच्या दिवसातील त्रास कमी करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात. शेवग्याच्या शेंगांमधील व्हिटामिन्स आणि मिनरल्स घटक गर्भाशयाचे कार्य आणि आरोग्य सुरळीत ठेवण्यास मदत करते.
४. रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत…
शेवग्याच्या पानांमध्ये, फूलांमध्ये अॅन्टीबॅक्टेरियल घटक असतात. यामुळे अनेक प्रकारच्या संसर्गापासून तुमचा बचाव होण्यास मदत होते. शेवग्याच्या शेंगांमध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे व्हिटामिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते.
५. पोटाचे आरोग्य…
शेवग्या पोटाशी निगडित आजारांपासून बचाव करते. शेवग्या आणि नारळ पाण्याचे एकत्र सेवन केल्या नेजुलाब आणि कावीळ बरा होतो शेवग्याच्या पानांमध्ये, शेंगांमध्ये बी कॉम्पलॅक्स घटकांचा मुबलक साठा असतो. त्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. शेवग्याच्या शेंगांमधील व्हिटामिन्स पचनकार्य सुधारते. कार्बोहायाड्रेट्सचे विघटन सुकर होते तसेच प्रोटीन आणि फॅट्सचा शरीराला फायदा होतो.
६. हाडांचे आरोग्य…
शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम, आयर्न आणि मुबलक व्हिटामिन्स आढळतात. यामुळे हाडांना मजबुती मिळते. त्यामुळे त्याचा रस किंवा दूधासोबत शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश करणे हाडांच्या बळकटीसाठी फायदेशीर ठरते. म्हणूनच मुलांच्या हाडांची वाढ सुधारण्यासाठी त्यांच्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा समावेश करा.
७. रक्तशुद्धी…
शेवग्याच्या पानांप्रमाणेच त्यांच्या शेंगामध्येदेखील रक्ताचे शुद्धीकरण करण्याची क्षमता असते. त्यामुळे हे शरीरात अॅन्टीबायोटीक म्हणून काम करते. त्यामुळे रक्तातील दुषित घटक वाढल्याने होणारात् त्वचाविकार कमी करण्यास शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात
८. लैंगिक आरोग्य…
शेवग्याच्या शेंगांमधील झिंक घटक स्त्रीयांप्रमाणेच पुरूषांचे लैंगिक आरोग्य सुधारण्यास फायदेशीर ठरते.
शेवग्याची शेंग एवढी गुणकारी असली तरी प्रत्येक गोष्टीचे सेवन प्रमाणात करावे एकाच दिवशी भरपूर असे करू नये. तसेच ऍलर्जी असणाऱ्यांनी सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.