त्या चार ही विद्यार्थींना शिक्षणासाठी मराठा संस्थेचा मदतीचा हात मिळाला

0

देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे 

                  राहुरी तालुक्यातील लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयातील हुशार चार विद्यार्थिनी आर्थिक अडचणी मूळे शिक्षण प्रवाहातून बाहेर पडण्यापूर्वीच  महाविद्यालयातील इतिहास विषयाचे विभाग प्रमुख प्रा.अमोल गायकवाड यांनी या विद्यार्थींनी आर्थिक मदत उपलब्ध करण्यासाठी धडपड सुरु केली. आणि त्यांच्या धडपडी यश ही आले. मराठा बहुउद्देशीय संस्थेचा त्यांच्या मदतीला धावून आली. या चार हि विद्यार्थींनीची वार्षिक फी साठी लागणाऱ्या मदतीचा धनादेश महाविद्यालयाच्या स्वाधीन केला आहे.

             लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयातील शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थीनी आर्थिक परीस्थिती हलाखीची असल्याने शैक्षणिक खर्च भरु शकत नसल्यामुळे शिक्षण प्रवाहातून बाहेर पडणार होत्या. या गोष्टीची जाणीव महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा.अमोल गायकवाड यांच्या लक्षात आली. त्यांनी या विद्यार्थींनीची भेट घेतली. घरची परीस्थिती समजावून घेतली. या चार हि विद्यार्थींना महाविद्यालयाकडे अर्ज करण्यास सांगितले. सोबत उत्पन्नाचे दाखले, मार्कसिट जोडण्यास सांगितले. या अर्जाच्या अनुषंगाने प्राचार्यांचे शिफारस पञ घेवून मराठा बहुउद्देशिय संस्थेकडे पाठविले.

              प्रा.अमोल गायकवाड यांनी मराठा बहुउद्देशीय संस्था यांना चार विद्यार्थींनी  आर्थिक अडचणी मूळे शिक्षणा पासून वंचित राहू शकतात असे कळविले. मराठा बहुउद्देशीय संस्थेने मदत केल्यास या चार विद्यार्थींनी शिक्षण प्रवाहात राहतील. असे प्रा. अमोल गायकवाड यांनी सांगितले.

                 चारही विद्यार्थिनी यांच्या शैक्षणिक अहवाल पहात मराठा संस्थेच्या सदस्यांनी तात्काळ शैक्षिक खर्च भरण्यासठी सहमती दर्शवली.मराठा बहुउद्देशीय संस्था संचलित मराठा एकीकरण समिती राहुरी तालुक्यासह परिसरात शैक्षणिक,वैद्यकीय इतरही येणाऱ्या सर्व समाज उपयोगी कार्यासाठी मदत करत असते तसेच सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्यासाठी मराठा एकीकरण समिती व जिजाऊंच्या लेकी समूहाच्या वतीने अनेक उपक्रम राबवत असतात.

           मराठा संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे, उपाध्यक्ष राजेंद्र लबडे,संचालक संदीप गाडे,विनायक बाठे,कुलदीप नवले,अविनाश क्षिरसागर,मराठा एकीकरण समितीचे समन्वयक सतीश घुले, मच्छिंद्र गुंड,अशोक कदम,रोहित नालकर,अविनाश पवार, अण्णासाहेब तोडमल,विजय मोटे,सुभाष पवार,सागर ताकटे,ज्ञानेश्वर सप्रे, विक्रांत कडू,प्रशांत मुसमाडे,ईश्वर गाढे,बलराज पाटील,अशोक तनपुरे,योगेश तनपुरे,अनिरुद्ध मोरे,शिवाजी तनपुरे,महेंद्र शेळके,धनंजय नरवडे,दादासाहेब पवार,ज्ञानेश्वर टेकाळे,संभाजी निमसे, सतिष ढोकणे,मुकुंद निमसे, सतिष चोथे आदी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here