कोपरगाव- येथील एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये ७७ वा भारतीय स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी, उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. रमेश सानप यांच्या हस्ते ध्वजारोहण व एन.सी.सी. कॅडेटचे परेड संचलन झाल्यानंतर अमृत वाटिका व विद्यार्थिनी कक्षासमोर वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयातील सर्व विभागांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकांचे प्रकाशन मा.प्र. प्राचार्य डॉ. रमेश सानप यांच्या शुभहस्ते आणि उपप्राचार्य डॉ. सुभाष रणधीर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.
रामभाऊ गमे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
‘अँटी रॅगिंग जागृती सप्ताह’ निमित्त आयोजित केलेल्या पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेतील पोस्टरचे सादरीकरण संपन्न झाले. त्याचबरोबर नूतनीकरण करण्यात आलेल्या सांस्कृतिक विभाग व विद्यार्थिनी कक्षाचे उद्घाटन संपन्न झाले.
नॅक समिती भेटीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात झालेल्या ह्या सर्व उपक्रमांबद्दल आणि त्यासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त करून विद्यार्थिनी कक्षाच्या प्रमुख प्रा. डॉ. उज्ज्वला भोर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. बी. आर.शेंडगे, अमृतवाटिकेचे आयोजक डॉ. वर्पे, एन.सी.सी. विभाग प्रमुख डॉ. सी.बी.चौधरी यांना धन्यवाद दिले.
या सर्वच कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक व सेवक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.