बारामती : मु.सा. काकडे कॉलेज समोरील निरा बारामती रोडवर तेजस उर्फ दादु विजय सवाणे वय २२ वर्षे, रा.वाघळवाडी ता. बारामती जि.पुणे हा हातात लोखंडी कोयता घेवुन मोठ्मोठयाने आरडाओरड करुन शालेय मुलांसमोर दहशत निर्माण करत असल्याने त्यास पोलीसांनी ताब्यात घेवुन त्याचेकडुन लोखंडी कोयता हस्तगत करून वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन गु. रजि.नं. ५७० / २०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम कलम ३७(२), ३७ (३), सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ११०, ११२, ११७ गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक डि.एस. वारूळे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही अंकित गोयल पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, आनंद भोईटे अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, पुणे ग्रामीण, गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग,यांचे मार्गदर्शनाखाली वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सचिन काळे सहा. पोलीस निरीक्षक, योगेश शेलार पोलीस उपनिरीक्षक, सहा. पोलीस उपनिरीक्षक दिपक वारूळे, पोलीस हवालदार रमेश नागटीळक, अनिल खेडकर, अमोल भोसले, सागर देशमाने, अमोल भुजबळ, पोपट नाळे पोलीस मित्र अजित नलवडे यांनी केली आहे.
पोलिसांकडून कडक सुचना.
अशा प्रकारे कोयत्याने किंवा प्रतिबंधक शस्त्राने कोणी दहशत पसरवीत असेल तर पुणे ग्रामीण पोलिसांकडून अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल,असेही वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.