हडपसर/पुणे १० ऑक्टोबर
प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ स्तरीय ‘स्वररंग-२०२३ स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठ स्तरीय ‘स्वररंग-२०२३ स्पर्धे’मध्ये S M Joshi college एस. एम. जोशी कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांमध्ये पारितोषिके मिळवून कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आह़े. शिवानी वाघ (वेस्टन सोलो गीत-तृतीय क्रमांक), शुभम शेंडे (वक्तृत्व स्पर्धा-द्वितीय क्रमांक), पाश्चात्य समूह गीत-द्वितीय क्रमांक, स्किट-तृतीय क्रमांक, माइम-द्वितीय क्रमांक इतर प्रकारात पारितोषिके मिळविली आहेत.
विद्यापीठ स्तरीय ‘स्वररंग-२०२३ या स्पर्धेसाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून प्रेरणा व प्रोत्साहन दिले. त्यामुळे विद्यार्थी हे यश मिळवू शकले. विद्यार्थ्यांच्या या यशात सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.शिल्पा शितोळे, डॉ.नम्रता कदम, डॉ.अर्चना पाटील, प्रा.माधुरी एकशिंगे, प्रा.अजित भोसले, प्रा.स्वप्निल ढोरे, प्रा.दीप्ती शेळके, डॉ.अतुल चौरे, उपप्राचार्य डॉ.किशोर काकडे, उपप्राचार्य प्रा.संजय जडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, प्रो.डॉ.एकनाथ मुंढे, ऑफिस प्रमुख शेखर परदेशी, पांडुरंग मोरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, कार्यालयीन सेवक व शिक्षकेतर सेवकांचे सहकार्य मिळाले.