दौंड, ता. २४ : दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी सोमनाथ मोहन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुप्रिया सुळे व दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांच्या हस्ते सोनवडी ( ता. दौंड ) येथे अंगणवाडी व आशा सेविका आणि मदतनीस सन्मान सोहळ्यात यांच्या हस्ते देण्यात आले.
दरम्यान सोमनाथ जाधव हे नेहमी समाजकार्य व पक्षाच्या कामासाठी तत्पर असतात. यापुढे त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची ध्येय धोरणे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे, नियुक्ती पञात नमूद करण्यात आले आहे. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष रामभाऊ टुले, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस अजित शितोळे, युवक अध्यक्ष सचिन काळभोर, महिला अध्यक्षा योगिनी दिवेकर, वंदना मोहिते, चैतन्य पाटोळे, सचिन गायकवाड, योगिता जोंधळे, आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.