कोपरगाव: आषाढी पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या तिन महिन्याच्या कालावधीमध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करून भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रसार व प्रसार पुज्य भिक्खू व बौध्दाचार्य यांनी केला जातो व या कालखंडातील कार्यक्रमाचे वर्षावास समारोप चंद्रपूर ताडोबा अभयारण्यात येथील पूज्य भिक्खु ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.२७ आक्टो.२०२४ रोजी वार रविवार सकाळी १०वा संपन्न होणार असल्याची माहिती धम्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रंभाजी रणशूर यांनी सांगितले आहे
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि अखिल भारतीय भिक्खु संघ प्रणित बुद्ध धम्म प्रसारक मंडळ ट्रस्ट कोपरगाव आयोजित अर्हन्त भिक्खु आनंद. भिक्खु निवासाचे भिक्खु संघास दान व कठीण चिवरदान वर्षवास सांगता सोहळा आयोजन पूज्य भिक्खु ज्ञानज्योती महास्थवीर व पूज्य भिक्खु संघ ताडोबा जंगल संघगिरी चंद्रपूर जे ताडोबा जंगलात वाघांच्या सानिध्यात मैत्री भावनेने राहतात व अनेक वर्षापासून जमिनीला पाठ लावून झोपलेले नाहीत असे त्यागी धुतांगधारी यांच्या हस्ते परमपूज्य भिक्खु ग्यानरक्षित औरंगाबाद पूज्य भिक्खु कश्यप तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा आ.आशुतोष काळे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे याप्रसंगी सकाळी ८ ते १०:३० वाजता पूज्य भिक्खु ज्ञानज्योती समवेत पूज्य भिकू संघाची शोभायात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते लुंबिनी उपवन बुद्ध विहार येथे होणार आहे दु. १ वाजता पूज्य भिक्खू ज्ञानज्योती महास्थविर यांची धम्मदेसना असे विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.यासाठी
विशेष सहकार्य सकल आंबेडकर,दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी , बुध्दीस्ट यंग फोर्स , भीम सरकार ग्रुप ,संविधान चौक,प्रबुद्ध बुद्ध विहार, माता रमाई महिला मंडळ उपस्थित राहणार असून कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्वस्त मंडळाचे सचिव रमेश घेगडमल, उपाध्यक्ष भीमराव गंगावणे, खजिनदार वसंतराव गाडे तसेच अनिल पाईक, नानासाहेब रणशूर ,प्रल्हाद जमदाडे, तुकाराम रणशूर , मोतीराम शिंगाडे, रमेश मोरे , नानासाहेब रोकडे, गोरखनाथ सोनवणे , राहुल धीवर, राजेंद्र घोडेराव आदी प्रयत्न करत असून मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन भिमराव गंगावणे यांनी केले आहे