शरद पवारांचे अमित शहांच्या टीकेला प्रत्युत्तर ! भाजपचा थेट लवासाची फाईल काढण्याचा इशारा ….

0

नवी दिल्ली प्रतिनिधी : शरद पवार अमित शहांबद्दल असं म्हणाले तरी काय? भाजपने थेट लवासाची फाईल काढू असा इशारा दिला आहे. अमित शहा यांच्या टीकेला आता शरद पवारांनी तशाच जहरी शब्दात उत्तर दिलंय. केंद्रीय गृहमंत्रिपदाची देशाला मोठी परंपरा लाभलीये. वल्लभभाई पटेलांपासून यशवंतराव चव्हाणांनी देशाचं गृहमंत्रिपद भूषवलं पण तडीपार राहिलेला माणूस पहिल्यांदाच गृहमंत्रिपदावर बसल्याचा टोला शरद पवारांनी लगावलाय.
          

शरद पवार फक्त इतक्यावरच थांबले नाहीत.. तर त्यांनी अमित शहांना अजून डिवचलं. हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरेंना जनतेने जागा दाखवली अशी टीका अमित शाहांनी केली होती. त्याला उत्तर देताना त्यांनी बाळासाहेबांनी कसा अमित शहांना आश्रय दिला होता त्याचा किस्सा सांगितला. पवारांच्या या आरोपांमुळे आता भाजपचं पित्त जास्तच खवळलंय. तुम्ही जर अमित शहांच्या जुन्या प्रकरणांवर बोलत असाल तर आम्हाला पण लवासाची फाईल उघडायला लावू नका असा इशाराच आता आशिष शेलारांनी दिलाय.

लोकसभेवेळी भटकती आत्मा असा शरद पवारांचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी सभेत केला.. त्याचा मोठा फटका त्यांना निवडणुकीत बसला. त्यातून धडा घेत विधानसभेवेळी कसली जहरी टीका शरद पवारांवर होणार नाही याची काळजी भाजपनं घेतली. मात्र विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा भाजपनं शरद पवारांना टार्गेट करायला सुरुवात केलीय. मात्र अमित शहांच्या जहरी आरोपांना शरद पवारांनी तितक्याच कठोर शब्दात उत्तर दिलंय. मात्र हे आरोपांचं राजकारण नेमकं कुठवर जातंय ते बघावं लागेल. बात निकली है तो दूरतक जाएगी, इतकं मात्र नक्की.. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here