आर जे एस फार्मसीच्या डॉ. सुवर्णा थोरात (बोजगे) यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

0

कुटुंब व महाविद्यालयाचा सन्मान

कोपरगाव प्रतिनिधी ;

 कोपरगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसीच्या सह. प्राध्यापिका डॉ. सुवर्णा थोरात (बोजगे) यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी संपादन करून महाविद्यालय व कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांनी आपला संशोधन प्रबंध सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसीमधून पूर्ण केला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण महाविद्यालय आणि कुटुंबाचा अभिमान वाढला आहे.

This image has an empty alt attribute; its file name is IMG-20250222-WA0003-1-1.jpg

डॉ. सुवर्णा थोरात या अत्यंत सामान्य, शेतकरी कुटुंबातील असून, त्या धारणगाव ता. कोपरगाव येथील श्री सोपानराव थोरात यांच्या कन्या असून शिरसगाव येथील श्री. अण्णासाहेब बोजगे यांच्या स्नुषा आहेत  आपल्या कठोर मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामागे त्यांचे पती श्री. प्रसाद बोजगे (प्राध्यापक, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज), त्यांचे सासरे श्री. अण्णासाहेब बोजगे, तसेच त्यांचे पीएच.डी. मार्गदर्शक डॉ.श्री. मनोज तारे  आणि डॉ. मीरा सी. सिंग  यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

डॉ. सुवर्णा थोरात यांच्या यशामुळे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले असून, त्यांच्या पुढील संशोधन कार्यासाठी संपूर्ण महाविद्यालय उत्सुक आहे. त्यांच्या या मेहनतीमुळे महाविद्यालयाचे शैक्षणिक क्षेत्रातील स्थान अधिक भक्कम झाले आहे. असे गौरवोद्गार ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सी. एन. कातकडे यांनी सत्कारा प्रसंगी काढले 

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. चांगदेवराव  कातकडे, सचिव  प्रसाद कातकडे, श्री. विजय कडू , श्री. दिपक कोटमे,  प्राचार्य डॉ. नितीन जैन, उपप्राचार्या सौ. उषा जैन, डॉ. विजय जाधव, डॉ. सचिन आगलावे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सौ. कावेरी चौधरी ,प्रा.सौ.उत्कर्षा लासुरे यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच त्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here