येवला, प्रतिनिधी
जुनी पेन्शन लागू करावी, शिक्षकांना टप्पा अनुदानात वाढ करावी या व शिक्षकांच्या इतर प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज येथे तहसीलदार यांच्याकडे प्रमुख वीस मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. येवला तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पंकज मगर यांना या मागण्यांचे निवेदन सादर केले.यावेळी सर्व राज्य कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन लागू करावी, टप्पा अनुदान लवकरात लवकर मंजूर करण्यात यावे,
आयटी विषय शिक्षकांचे समायोजन, वेतन आयोगाचे थकीत हप्ते अदा करणे, इयत्ता अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करणे, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार दूर करणे व शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून मुक्त करणे या मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी प्रा.अंबादास ढोले यांनी मागण्या संदर्भात सविस्तर विवेचन केले.
या प्रसंगी येवला तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा.जालमसिंग वळवी, प्रा.राजेन्द्र सोनवणे प्रा.सुनील देवरे,प्रा.शरद पाडवी, प्रा. सुयोग पारेख, प्रा. ज्ञानेश्वर माळी, प्रा. युवराज घनकुटे, प्रा. तुळशीराम सातकर, प्रा.महेश कुद्रे, प्रा.सतिश वेलजाळे,प्रा. सीमा बनकर, प्रा. प्रियंका निकुंभ, प्रा. दिपाली मते, प्रा. दिपाली नवले, प्रा. शारदा घोडके, प्रा. किठे, प्रा. सागर वरे, प्रा. रायते आदी उपस्थित होते.