मृत्यूनंतरही जपली सामजिक बांधिलकी ;वृद्धाश्रमातील वृद्धाचे मरणोत्तर नेत्रदान

0

शिर्डी/कोपरगाव (प्रतिनिधी) : साईबाबा संस्थान ट्रस्टचे श्री साईनाथ रुग्णालय येथे नुकतीच आय बँक सुरू करण्यात आलेले असून या आय बँकेमध्ये आज गुरुवार दिनांक 20 3 2025 रोजी द्वारकामाई वृद्धाश्रम येथील शशीधर सिताराम बेकल वय वर्ष 63 राहणार द्वारकामाई वृद्धाश्रम शिर्डी यांचे मरणोत्तर नेत्रदान संपन्न झाले , याकामी साईनाथ नेत्रपेढीचे ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर तसेच आय बँक मॅनेजर डॉअशोक गावित्रे साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका मैथिली पितांबरे ,साईबाबा हॉस्पिटल चे वैद्यकीय संचालक डॉ शैलेश ओक,तसेच

उपसंचालक  प्रीतम वडगावे स , मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांचे मार्गदर्शन लाभले याप्रसंगी  ऋषिक्रोते ,श्रद्धा भुसावळ, सचिन घारे ,अकबर मामा तसेच  डॉ निघूते मॅडम, डॉ विखे मॅडम, डॉ पाटिल सर आदींच मोलाचं सहकार्य लाभलं, या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींच्या आयुष्यात नवीन प्रकाशाची पहाट होणार आहे या नेत्र पेढीमुळे अनेक अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश फुलणार असून साईबाबांच्या हयातीत सुरू असलेले रुग्णसेवेचे काम शिर्डी मध्ये चालू असून या नेत्रपेढी मुळे अनेक अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश  येणार असून हजारो अंध व्यक्तीना याचा फायदा होणार आहे  मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी 7972677781 या नंबर वर संपर्क करण्याचा आवाहन डॉ अशोक गावित्रे यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here