सातारा: माझं राजकरण संपलं तरी चालेल पण मी शरद पवार यांच्यासमोर झुकणार नसल्याचे सांगत राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी शड्डू ठोकला आहे. मी मंत्री झालोय हे पवारांना अजूनही मान्य होत नाही असा टोलाही गोरे यांनी लगावला.
माण तालुक्यातील आंधळी येथील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. जयकुमार गोरे यांनी म्हटले की, मी मंत्री झालोय हे पवारांना अजून मान्यच होईना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा शरद पवारांना टोला, माझं राजकारण संपलं तरी चालेल पण मी पवारांच्या पुढे कधीच झुकणार नसल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटले.
बारामतीकरांना पहिली कळ लागली…
जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणात पुढे म्हटले की, माण खटावच्या लोकांनी बारामतीच्या पवारांवर प्रचंड प्रेम केले. मात्र याच बारामतीच्या लोकांना सगळ्यात पहिली कळ लागली. त्यांना वाईट वाटायला लागलं की सामान्य कुटुंबातील पोरगा आमदार झाला, सामान्य कुटुंबातला रेशनिंग दुकानदाराचा मुलगा आमदार झाला याचं पवारांना वाईट वाटतंय. मी मंत्री झाल्याचं तर त्यांना मान्यच नाही. सगळ्यांनी नेत्यांनी शरद पवारांसोबत तडजोड केली असेल. मात्र पश्चिम महाराष्ट्रातला एकमेव आहे जो पवारांपुढे झुकला नाही असे जयकुमार गोरे यांनी म्हटले.
तर आमदारकी सोपी झाली असती…
जयकुमार गोरे यांनी म्हटले की, मी बारामतीच्या पुढे झुकलो असतो तर माझी आमदारकी सोपी झाली असती. मात्र यामुळे आपल्या शेतात पाणी आलं नसतं, मी त्यांची गुलामगिरी स्वीकारली असती तर माण खटावला पाणी मिळालं नसतं, माझा विरोध बारामतीला आणि पवारांना अजिबात नाही मात्र ज्यांनी या तालुक्याला मातीला पाण्यापासून वंचित ठेवलं त्यांना माझा विरोधात आहे असं सुद्धा मंत्री जयकुमार गोरे म्हणाले.
जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात पवार गटावर आरोप….
जयकुमार गोरे यांनी एका महिलेला छळ केला असल्याचा आरोप करण्यात आला होता. तर, गोरे यांनी आरोप फेटाळून लावले होते. या प्रकरणातील महिला आणि इतर आरोपींचे शरद पवार गटाच्या नेत्यांसोबत संबंध असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटले होते.