संविधान आणि गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी मी पंतप्रधान मोदी सोबत आहे- रामदास आठवले 

0

बुलडाणा (प्रतिनिधी)- केंद्रातील भाजप आघाडीचे सरकार उत्तम प्रकारे काम करत असून चांगल्या कामगीकीरीच्या भरवशावर २०२९ लोकसभा निवडणुकीत एनडीए बाजी मारणार असून पंतप्रधानपदी चौथ्यांदा विराजमान होतील अशी भविष्यवाणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॅा.रामदास आठवले यांनी बुलडाणा येथील पत्रकार परिषदेत केले. विरोधी पक्षाने या मुद्यावरून रान उठवले असले तरी नरेंद्र मोदीच हे चौथ्यांदा पंतप्रधान होणार असा दावा त्यांनी केला. विरोधी पक्षाचे नेते काहीही म्हणत असले तरी त्याला काही आर्थ नाही असे ही ते म्हणाले.आठवले बुलडाणा जिल्हा दैऱ्यावर आले असता शासकीय विश्राम भवन बुलडाणा येथे पत्रकारांशी संवाद करतांना विविध प्रश्नांवर चर्चा केली. 

   

  नरेंद्र मोदी हे देशाबरोबरच जगातील मोठे लोकप्रीय नेते असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अभिनेत्री खा.कंगना राणावत सांगतात त्याप्रमाणे ते देवाचे आवतार नाही असे ते म्हणाले. बुध्द गया प्रकरणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून बौध्द धर्मीयांच्या भावना व मागणी त्यांच्या कानावर टाकणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र त्याच बुध्द गया हे बुध्दाच्या ताब्यात देण्याची मागणी पूर्ण झाली नाही तर आपण पदाचा राजीनामा देणार नाही असा खुलासाही त्यांनी केला. बुध्द गया बुध्दाच्या ताब्यात देण्यात यावी या प्रकरणी माझा पक्ष व मी त्यासाठी झटत आहे व झटत राहू इतर धर्मियांचे धर्मस्थळे त्या त्या धर्माच्या धर्मगुरू व त्या त्या समाजाच्या ताब्यात आहे तसे बुध्दगय हे बुध्दांच्या व सर्व व्यवस्थापन बुध्दांच्याच ताब्यात असावे व ते मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. ते म्हणाले की, हा विषय मुळात केंद्र सरकाराशी संबंधित नसून बिहार सरकारशी संबंधित आहे पण ती मागणी रेटून धरणार आहे व मिळवून घेवू. 

    दिल्लीत कांग्रेस व आप वेगवेगळे लढले, पश्चिम बंगाल मध्ये कांग्रेस ममता बॅनर्जी यांच्यात पटत नाही. महाराष्ट्रात आघाडीचेच सरकार येणार असा दावा त्यांनी केला. 

  उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पूर्णपणे संपणार नाही, त्याची ताकद आमदार खासदार कमी होतील. परंतु उध्दव ठाकरे हे नेतेच राहणार आहे. मात्र चंद्रकांत खैरे, अदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची सत्ता येईल आणि अदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होतील हे अशक्य आहे, असेही ते म्हणाले. वर्ध्यात माजी खासदार तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या विषयाची फारसी माहिती नसल्याचे सांगून आढठवले यांनी या विषयावर जास्त बोलण्याचे टाळले. परभणीतील हिंसाचार प्रकरणी प्रश्न विचारला असता सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलीसांच्या मारहाणीमुळेच झाला असून तसे न्यायलयाने देखील सांगीतले आहे त्यामुळे दोषी पोलीसांवर कारवाई व्हावी अशा शब्दांत आठवले यांनी मागणी केली. 

  नितेश राणे मुस्लिमांबद्दल बोलतात, कट्टर हिंदुत्ववादी भूमिका मांडतात परंतू ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. ती युती सरकारची नाही असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. केंद्र सरकार  किंवा महाराष्ट्रातील युती सरकार मुस्लिम विरोधी नाही. राज ठाकरे यांची मनसे आमच्या सोबत असली तरी विधानसभा निवडणुकीत त्यांचा युतीला काहीच फायदा झाला नाही. 

    मराठी भाषेचा अभिमान ठीक आहे मात्र त्याची सक्ती करणे, जब्बरदस्ती करणे , मारहाण करणे चूकीचे आहे. महानगरी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, मेट्रो सिटी आहे तीथे मराठीची सक्ती नको, सर्व दुकानाच्या पाट्या मराठीत असने अश्यक्य असल्याचे ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे विविध मागण्या केल्याची माहिती आठवले यांनी दिली. 

   मंत्री मंडळात एक जागा, भूमिहान लोकांना पाच एकर जमिन, अतिक्रमण जमिनीचे कायम भाडे पट्टे,विविधमंडळ आणि शासकीय समित्यात रिपाइं कार्यकर्तेंना प्रतिनिधीत्व, भूमिहीनांना झुडूपी जंगले कसेल त्यांना देण्यात यावी आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. 

    महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उत्तमरित्या काम करत असल्याचे आठवले यावेळी म्हणाले. 

  या पत्रकार परिषदेचे सुत्रसंचलन रिपाइं संपर्क प्रमुख बाबासाहेब जाधव यांनी केले यावेळी पत्रकार परिषदेत दक्षिण जिल्हाध्यक्ष इंजिनिअर खरात, उत्तरचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार, विदर्भ महीला उपाध्यक्ष आशाताई वानखेडे, सतीष बोर्डे, रिपब्लिकन फेडरेशनचे अध्यक्ष इंजीनीयर विजयजी मोरे, महीलाध्यक्षा वंदनाताई वाघ, युवाध्यक्ष प्रकाश पाटील म्हस्के, अल्पसंख्याक आघाडीध्यक्ष नबाब मिर्झा बेग, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.मुक्तार पठाण, जिल्हाउपाध्यक्ष भाऊसाहेब वानखेडे, युवानेते विजय साबळे, बाळासाहेब आहिरे, केशवराव सरकटे, हिम्मतराव जाधव, उषाताई इंगळे वर्षाताई महाजन, पुनम भटकर इत्यादी रिपाई पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here