वाई-पोलादपूर रस्त्यावरील वृक्षांची आर्त हाक …

0

नको मदत, नको पुनर्वसन, करा आमचे तिथेच जतन… 

उमेश लांडगे (सातारा) ; वारंवार होणाऱ्या वृक्षतोडीमुळे निसर्गरम्य सातारा बेचिराख होतो की काय? असेच वृक्ष प्रेमींना वाटू लागले आहे. त्यातच मनमानी करणारे ठेकेदार याच्यांमुळे निसर्गाचे नुकसान होत आहे. वाई पोलादपूर रस्त्यावरील शेकडो वृक्षांची कत्तल होणार असल्याने वाई तालुक्यातील निसर्गप्रेमी जनता गेल्या काही दिवसापूर्वी रस्त्यावर उतरली होती. त्यांनी प्रशासन आणि कंत्राटदारांना नको पर्यावरणाचा ऱ्हास नको असला विकास असा संदेश दिला होता. वाई-पोलादपूर रस्त्यावर वाहतूक कोंडी अथवा वाहतुकीस अडथळा असा कोणताही प्रकार आजखेर घडला नाही. त्यामुळे निसर्गरम्य रस्त्यावर या निसर्गाचा आनंद घेण्यासाठीच पर्यटकांची वर्दळ आहे. 

आधी झालेली वृक्षतोड यामुळे या परिसरात पर्यावरणाचे मोठे नुकसान झाल्याने जनतेने प्रांतांना निवेदन दिले होते. वाईच्या प्रांतांनी याबाबत संबंधित ठेकेदाराला वृक्षतोड करू नये अशा सूचना केल्या होत्या परंतु सूचनेनुसार कोणतेही काम न करता ठेकेदाराने मनमानी करत रस्त्यावर असणारे डेरेदार आंब्याच्या वृक्षांची कत्तल केली आहे. त्यामुळे अनेक वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाचे नुकसान आणि पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे.

 वाईचे प्रांत ठेकेदारावर कडक कारवाई करणार का? पर्यटनमंत्र्यांच्या जिल्ह्यात नेमके चालले काय? तोडलेल्या वृक्षांमुळे जिल्ह्यात पर्यटन वाढणार काय?  पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे पर्यटनाचे नुकसानीची भरपाई नेमकी देणार कोण? मस्तावलेल्या कंत्राट दारावर कारवाई करणार कोण?

राजकीय वरदहस्त असल्याने कंत्राटदाराने प्रांतांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे

जनतेच्या हितापेक्षा कंत्राटदाराचे हित जपणारा राजकीय नेता कोण? दबक्या आवाजात अशा चर्चा सुरू आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here