कै.सौ.कविता कैलास रेवगडे स्मृतीप्रित्यर्थ; डॉ.बाबासाहेब आंबेडकराचे विचार मनामनात पोहचवा
सिन्नर प्रतिनिधी : पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या पवित्र स्मृतीस त्यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यासाठी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रभान रेवगडे,प्रमुख अतिथी सौ.भाग्यश्रीताई पाटोळे (पोलिस पाटील, आशापुर),गणेश रेवगडे (पोलिस पाटील,पाडळी),मुळक सर,दशरथ पाटोळे,रामहरी रेवगडे,गणेश शिंदे,धनंजय रेवगडे,करण रेवगडे,केशव रेवगडे,भास्कर बोगीर,यांनी महामानवास आदरांजली वाहून त्यांच्या जीवन कार्याची विद्यार्थ्यांपुढे माहिती समर्पित केली. कै.सौ.कविता कैलास रेवगडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी पाताळेश्वर विद्यालयास संविधान प्रती भेट देण्यात आली. तसेच सौ.भाग्यश्री पाटोळे यांची सिन्नर तालुका पोलिस पाटील संघटनेचे तालुका कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.
बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस.बी.देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी शाहू, फुले, अहिल्याबाई होळकर,राजे शिवाजी या महान विभूतींच्या विचारांचा आदर घेऊन व बाबासाहेब आंबेडकरासारखे उच्च शिक्षित होऊन आपल्या जीवनात आपण खूप मोठे होऊन समाजाचे देणे लागू हा विचार सतत आपल्या मनात तेवत ठेवा.
विद्यालयाचे उपशिक्षक आर.व्ही.निकम यांनी बाबासाहेबांच्या जीवन चरित्राचे पैलू उलगडताना साधी राहणी व उच्च विचार अंगी बाळगा संविधानातील हक्क समजून घ्या व त्यांचे अनुकरण करा असे सांगितले.याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ सविता देशमुख यांनी केले व गिरी आर.टी.यांनी आभार मानले. याप्रसंगी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयातील उपशिक्षक टी.के.रेवगडे,बी.आर. चव्हाण,एस.एम.कोटकर, एम.एम. शेख, सी.बी.शिंदे,के.डी.गांगुर्डे,एस. डी.पाटोळे, आर.एस.ढोली, ए.बी.थोरे हे उपस्थित होते.