नवीन नांदेड : नवीन नांदेड जिंदमनगर गोपाळचावडी ता जि नांदेड येथिल रहिवाशी रोहीत राजेश खटके यांचे वयाच्या १४ वर्षात अल्पशा आजाराने निधन झाले .
राजेश गणेशराव खटके यांचे चिरंजिव रोहीत यांचे वय १४ वर्षे असून तो ९ व्या वर्गात सिडको येथिल शिवाजी विद्यालयात शिक्षण घेत होता त्याची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांला छ .संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरु असताना उपचाराला त्याचे शरीर प्रतिसाद देत नसल्यामुळे दि १३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ च्या दरम्यान निधन झाले. असून त्याच्या पश्चात आई वडील आजी अजोबा काका काकु एक छोटा भाऊ बहीणी असा परिवार असून दि १४ एप्रिल रोजी गोपाळचावडी समशान भुमी येथे सकाळी ११ वा त्याच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले. रोहीत हा शांत संयमी व शिक्षणात हुशार असल्यामुळे कमी वयात त्याचे निधन झाल्या मुळे जिंदमनगर गोपाळचावडी परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे