[ad_1]
माणूस प्रपंचासाठी जशी धावपळ करतो, त्याचप्रमाणे त्याने देवासाठी धावपळ करावी. त्यामुळे त्याचे जीवन सार्थकी लागेल, असे प्रतिपादन हरिशरणगिरीजी महाराज यांनी केले.
.
वैजापूर तालुक्यातील बोरदहेगाव येथे जनेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त हरिशरणगिरीजी महाराज यांचे कीर्तन झाले. हरिशरणगिरीजी महाराजांनी “करि ऐसी धावा धाव! चित्त लावी चरणा ते!!” या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. हरिशरण महाराज सांगतात की, माणसे स्वतःच्या प्रपंचासाठी खूप धावपळ करतात. रात्रंदिवस कष्ट करतात. असेच कष्ट माणसाने देवासाठी व देवाच्या भक्तीसाठी करावेत. माणसाने देवासाठी धावाधाव केली तर देव संकटात मदत करतो. पुढे हरिशरणगिरीजी महाराज म्हणाले की, बोरदहेगाव ही राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांची जन्मभूमी आहे. खुद्द त्यांचीही इच्छा होती की गावात महादेव मंदिर असावे. बोरदहेगाव ग्रामस्थांनी गावामध्ये जनेश्वर महादेव मंदिर उभारले व त्या मंदिराचा आज वर्धापन दिन आहे. ही खूप गावकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बाब आहे. त्यानंतर महाराज शेवटी म्हणाले की, बोरदहेगाव ही खूप पवित्र भूमी आहे. या ठिकाणी दोन बाबा जन्माला आले. एक राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचा जन्म या ठिकाणी झाला. दुसरे बाबा म्हणजे वारकरी संप्रदायासाठी व धार्मिक कामासाठी पुढाकार घेणारे माजी खासदार रामकृष्ण बाबा हे होय. त्यानंतर महाराजांनी जनेश्वर महादेव मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल ग्रामस्थांचे कौतुक केले. पंचक्रोशीतील भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी आमदार रमेश बोरणारे, बाजार समिती सभापती रामहरी जाधव यांची उपस्थिती होती.
[ad_2]