Dr. Ashwin Valsangkar And Dr. Sonali Valsangkar Likely To Be Called For Police Questioning In Dr. Shirish Valsangkar Suicide Case | डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: मुलगा आणि सुनेचीही चौकशी होणार? संशयित महिलेच्या वकिलाचा धक्कादायक दावा – Solapur News

0

[ad_1]

सोलापूर शहरातील प्रसिद्ध मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांकडून कुटुंबाची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांचे पुत्र आणि या प्रकरणातील फिर्यादी असलेले डॉ. अश्विन वळसंगकर आणि त्यांची सून डॉ.

.

यामध्ये डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्याचे कारण ठरलेल्या संशयित महिलेच्या वकिलांनी केलेल्या दाव्यानुसार महिलेने केवळ एक मेल केला आहे. बाकी कुठेही आर्थिक व्यवहार किंवा डॉक्टरांच्या चरित्रावर संशय घेऊन आरोप केलेले नाहीत. संशयित महिलेला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून 17 एप्रिल रोजी तिने डॉक्टरांना केलेल्या ई-मेलची प्रतही पोलिसांच्या वतीने जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस आता कसून तपास करत असून आणखी काय माहिती समोर येते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

चिठ्ठी लिहून ठेवली यात महिलेवर आरोप

आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिट्टी मध्ये त्यांनी एका महिलेचे नाव लिहिले असून या महिलेमुळेच आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. या प्रकरणी या महिले विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेला पोलिसांनी ताब्यात देखील आहे. प्रसिद्ध मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्येच प्रशासकीय अधिकारी म्हणून ही महिला काम करते. या महिलेमुळेच आपण आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख वळसंगकर यांनी आपल्या चिठ्ठी मध्ये केला आहे.

मेंदू व मज्जा संस्थेवरील उपचारांसाठी प्रसिद्ध

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार झाले. उपस्थितांनी त्यांना साश्रू नयनांनी निरोप दिला. यावेळी एसपीआयएन हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना दु:ख आवरता आले नाही. काहींनी हंबरडाच फोडला होता. मोदीखाना स्मशानभूमीत इंडियन मेडीकल असोसिएशन, निमा व होमिओपॅथी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह समाजातील विविध स्तरातील मान्यवरांची उपस्थिती होती. मेंदू व मज्जा संस्थेवरील उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या 69 वर्षीय डॉ. वळसंगकरांनी शुक्रवारी राहत्या घरात आत्महत्या केली होती. रात्री साडेआठच्या सुमारास बेडरूममध्ये त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली.

जिद्दी माणूस…डॉक्टरकीसोबत विमान चालवण्यातही पारंगत

डॉ. व‌ळसंगकर यांच्यात काही तरी वेगळं करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती होती. एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस ही संस्था स्थापन करून त्यांनी ते सिद्ध केले. विद्यार्थीदशेपासूनच त्यांनी डॉक्टर होण्याचे ध्येय होते. स्वत:चे रुग्णालय उभारण्याचाही मानस होता. विशेष म्हणजे ते वैमानिकही होते. मनात जे यायचे ते करून दाखवण्याची जिद्द होती. मी व शिरीष शालेय जीवनापासूनचे मित्र. माझे आणि त्यांचे वडील दोघेही मित्र होते. दोघांनी मिळून हॉस्पिटल सुरू केले होते. हरिभाई देवकरण प्रशालेत शालेय प्रवास होता. त्यानंतर डॉ. व्ही.एम. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेतले. दोन वर्षे मुंबई व त्यानंतर इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी गेले होते. तिथून त्यांनी वाडिया हॉस्पिटलमध्ये सेवा सुरू केली. स्वत:चे इस्पितळ उभे केले. आज त्यांच्या रुग्णालयात महाराष्ट्रासह कर्नाटक प्रांतातूनही रुग्ण येतात. आमच्याच वर्गातील उमा नावाच्या मुलीवर त्यांचे प्रेम होते. त्याचे रुपांतर विवाहात झाले. पत्नीसुध्दा स्त्रीरोग तज्ञ. करिअरसोबत त्याने छंदही जोपासला होता. पुस्तकांची प्रचंड आवड होती.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here