[ad_1]
पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तणाव कमी करणे आणि मानसिक आरोग्य सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, ईशा फाउंडेशनने पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) वरिष्ठ अधिकारी, हवालदार आणि प्रशिक्षणार्थी अशा ३०० सदस्यांसाठी गुरवारी ‘मिरॅकल ऑफ म
.
या सत्रात सहभागींना ‘मिरॅकल ऑफ माईंड’ ची ओळख करून देण्यात आली, जो सद्गुरूंनी सुरू केलेला जागतिक मानसिक कल्याण उपक्रम आहे, ज्यात ॲप-आधारित प्लॅटफॉर्मद्वारे साधे परंतु प्रभावी ७-मिनिटांचे मार्गदर्शित ध्यान प्रदान केले जाते. या अनुभवाने उपस्थितांवर सखोल प्रभाव पडला, त्यापैकी अनेकांना हे ध्यान अत्यंत शांत आणि ताजेतवाने करणारे वाटले.
आयपीएस नम्रता पाटील यांनी सहभागींना ॲपचा नियमितपणे वापर करण्यास प्रोत्साहित केले. “मला माहित आहे की, तुम्हाला लवकर उठून दोन तास शारीरिक प्रशिक्षण घ्यावे लागते. परंतु आपण जर या ध्यानासाठी सात मिनिटे काढू शकलो, तर त्याचा निश्चितच फायदा होईल. असा प्रयत्न करण्यात काहीच हरकत नाही,” असे त्या म्हणाल्या.
ईशा टीमशी संवाद साधताना त्यांनी सांगितले, मी इथे उपस्थित असलेल्या सर्वांसोबत हे ७-मिनिटांचे ध्यान अनुभवले, आणि ते खूपच आरामदायक होते. मार्गदर्शनामुळे ध्यान करताना लक्ष केंद्रित करणे सोपे झाले. ध्यानाच्या सुरुवातीला दाखवलेल्या व्हिडिओमुळे या संपूर्ण उपक्रमाचा स्पष्ट संदर्भ मिळाला. मी ‘मिरॅकल ऑफ माईंड’ ॲपचा वापर करून हे ध्यान सुरू ठेवेन. त्यांनी पुढे सांगितले की, त्या ग्रुप-१ च्या, तसेच दौंड येथील एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींना या ध्यानाची ओळख करून देतील.
लाँच झाल्यापासून ‘मिरॅकल ऑफ माईंड’ ॲपला जगभरातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे, केवळ १५ तासांत १० लाख डाउनलोड्स आणि दोन आठवड्यांहून कमी कालावधीत २० लाख डाउनलोड्सचा टप्पा पार केला आहे. हे ॲप लाँचपूर्वी लागोपाठ तीन दिवस आयओएस हेल्थ अँड फिटनेस चार्टमध्ये अव्वल स्थानावर होते आणि भारतात मोफत ॲप श्रेणीत टॉप १० मध्ये आणि अमेरिकेत टॉप ३० मध्ये स्थान मिळवले. मुख्य ७-मिनिटांच्या मार्गदर्शित ध्यानाव्यतिरिक्त, हे मोफत ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या मानसिक आरोग्याच्या प्रवासाचा मागोवा घेण्यासाठी साधने उपलब्ध करून देते आणि दीर्घकालीन भावनिक संतुलन तसेच स्पष्टता वाढवण्याच्या उद्देशाने सद्गुरूंद्वारे कालातीत अंतर्दृष्टी प्रदान करते.

[ad_2]