Unique protest against gas cylinder price hike | गॅस सिलिंडर दरवाढीचा अनोखा निषेध: शिवसेना उबाठाच्या महिलांनी एसडीओंना भेट दिली चूल; सरकारला जाहीरनाम्याची आठवण – Amravati News

0



दर्यापूर येथे शिवसेना (उबाठा) पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात अनोखे आंदोलन केले. त्यांनी एसडीओ कार्यालयात जाऊन उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांना प्रतीकात्मक चूल भेट दिली.

.

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडर आणि उज्वला गॅस योजनेत ५० रुपयांची वाढ केली आहे. महिला कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, २०१४ मध्ये ५०० रुपयांना मिळणारा सिलिंडर आता ९०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे गृहिणींचे घरखर्चाचे नियोजन कोलमडले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख अलका निलेश पारडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. शहर प्रमुख गोपाल अग्रवाल आणि अखिल भारतीय धनगर समाज महासंघाच्या विदर्भ अध्यक्षा प्रा. संगीता पुंडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

आंदोलकांनी सरकारवर टीका केली की, केरोसीन बंद केले आहे. झाडे तोडण्यावर बंदी असल्याने सरपणही आणता येत नाही. महिलांनी सरकारला निवडणूक जाहीरनाम्याची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या की दरवाढ अशीच सुरू राहिली तर चुलीवर स्वयंपाक करण्याचे दिवस दूर नाहीत.

या आंदोलनात येवदा पंचायत समिती सर्कल प्रमुख भावना सोळंके, गायत्री नगर महिला आघाडी शाखा प्रमुख सुनीता मांडवे, उपशहर प्रमुख संगीता चवळे, कविता मालवे, विद्या बयस, संगीता बनारसे यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here