सर्जेराव शेलार यांचा आत्महत्त्या की खून ? 

0

द्रोणागिरी रेल्वे स्टेशन परिसरात आढळला मृतदेह.

उरण दि २४(विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील द्रोणागिरी रेल्वे स्टेशन जवळ दिनांक २४/५/२०२५ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नागरिकांना एकाचे मृतदेह आढळून आले. ही बाब सोशल मीडियावर त्वरित व्हायरल झाली. मृत्यू कोणाचा झाला याबाबत पोलिसांनी तपास केला असता सदर मृतदेह उरण तालुक्यातील बोकडविरा येथील सर्जेराव शेलार (अंदाजे वय ६०) यांचा असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. सदर घटना ही आत्महत्त्या आहे की खून आहे  याचा अधिक तपास उरण पोलीस व रेल्वे पोलीस प्रशासनाकडून सुरु आहे.  उरणहून बेलापूर कडे जाणाऱ्या लोकल ट्रेन खाली सापडून सर्जेराव शेलार यांचा मृत्यू झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून या घटनेमुळे उरणच्या नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here