High Paying नोकरी हवी? हे 13 फ्री AI कोर्स करून मिळवा चांगली संधी!

0

[ad_1]

AI courses For High Paying Job : आजकालच्या ग्रॅज्युएट झालेले मुलं देखील चांगला पगार असलेली नोकरी मिळेल असं वाटतं. पण आजकालच्या या स्पर्धेच्या जगात सतत काही ना काही शिकत राहणं गरजेचं असतं. आर्टिफिशियल इंटेलिजेन्सची मागणी खूप चांगल्या पद्धतीनं वाढत आहे आणि इतकंच नाही तर योग्य स्किल्स असलेल्या लोकांना यात खूप संधी आहेत.  

AI फक्त कोणत्याही विशिष्ठ टेक्नॉलॉजी सेक्टरपर्यंत आहे किंवा एकाच ठिकाणी त्याचा वापर होतो असं नाही. तर बिझनेस आणि हेल्थकेअर सारख्या क्षेत्रांमध्ये देखील त्याचा समावेश आहे. त्यामुळे AI एक्सपर्ट्सची मागणी वाढली आहे. त्यामुळे आपण आज अशा काही फ्री असलेल्या AI कोर्सेस विषयी जाणून घेणार आहोत. जे तुमच्या करिअरला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करतील. नुकत्याच फोर्ब्सच्या एका रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की फक्त बेसिक AI नॉलेज असल्यानं काही होत नाही. चांगला पगार असणारी नोकरी हवी असेल तर AI टूल्स विषयी तुम्हाला योग्य माहिती असणं गरजेचं आहे. त्यातही टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये. रिपोर्ट्मध्ये असं सांगण्यात आलं की AI प्रत्येक इंडस्ट्रीला बदलत आहे. त्यामुळे AI स्पेशलिस्ट्सची मागणी वाढली आहे. फोर्ब्सनं 13 खास AI कोर्सेसची एक लिस्ट बनवली आहे जी तुमची मार्केट व्हॅल्य वाढवू शकतो. 

13 फ्री AI कोर्सेस

न्यूरल नेटवर्क्स (गूगल फॉर डेव्हलपर्स)

इंट्रोडक्शन टू कम्प्यूटर व्हिजन अ‍ॅन्ड इमेज प्रोसेसिंग (कोर्सेरा)

मशीन लर्निंग क्रॅश कोर्स (गूगल फॉर डेव्हलपर्स)

इन्ट्रो टू पायटॉर्च अ‍ॅन्ड न्यूरल नेटवर्क्स (कोडकॅडमी)

मशीन लर्निंग स्पेशलाइझेशन (एन्ड्रयू एनजी)

एक्सप्लोर टेक्स्ट टू स्पीच यूजिंग जनरेटिव AI (आईबीएम स्किल्सबिल्ड)

एप्लाइड मशीन लर्निंग इन पायथन (कोर्सेरा)

डीप लर्निंग लेक्चर सीरीज 2020 (डीपमाइंड अ‍ॅन्ड यूसीएल)

समराइजिंग डेटा यूजिंग आईबीएम ग्रेनाइट (आईबीएम स्किल्सबिल्ड)

बिल्ड योर फर्स्ट चॅटबॉट (आईबीएम स्किल्सबिल्ड)

यूज जनरेटिव AI फॉर सॉफ्टवेयर डेव्हलपमेंट (आईबीएम स्किल्सबिल्ड)

आईबीएम ग्रेनाइट मॉडल्स फॉर सॉफ्टवेयर डेव्हलपमेंट (आईबीएम स्किल्सबिल्ड)

क्लासिफाइंग डेटा यूजिंग ओपन सोर्स एलएलएमस (आईबीएम स्किल्सबिल्ड)

इतके कोर्स असताना तुम्ही योग्य कोणता कसा निवडायचा?

फोर्ब्सनं दिलेल्या सल्ल्यानुसाक, हे AI स्किल्स तुम्ही आता जे काम करत आहात त्यासाठी कसे फायदे कारक ठरू शकतात. जेणे करून तुम्हाला या सगळ्या कोर्सचा फायदा होईल. जर तुम्हाला खूप काही येत असेल आणि त्यात जर तुमच्याकडे आणखी AI स्किल्स असतील तर त्याचा तुमच्या करिअरवर आणखी फायदा होण्याची शक्यता आहे. 

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here