[ad_1]
जिल्ह्यातील चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांची पाणी पातळी मर्यादेपेक्षा अतिशय खोल (डार्क झोन) गेली आहे. त्यामुळे उर्वरित सर्व 12 तालुक्यांतील नव्या विहीरी अडचणीत आल्या आहेत. भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या (जीएसडीए) अहवालानुस
.
पिण्याच्या पाण्यासाठीचा स्रोत म्हणून विहीर खोदण्यास मनाई करता येत नाही. परंतु त्यासाठीही निकष गुंडाळून ठेवता येत नाही. सिंचनासाठीची विहीर खोदताना मात्र परवानगी आवश्यक ठरते. शासकीय योजनांमधून ज्या विहीरी खोदल्या जातात, त्यासाठी तर हे नियम अधिक काटेकोर पाळले जातात. त्यामुळे मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, अचलपुर, दर्यापुर, अंजनगाव सुर्जी, भातकुली, अमरावती, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, धारणी, चिखलदरा या 12 तालुक्यांमधील योजनांच्या विहीरी अडल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, मनरेगा धडक सिंचन योजना या शासकीय योजनांच्या माध्यमातून विहीर बांधण्यासाठी अनुदान मिळते. परंतु पाण्याची पातळी खोल गेल्याने ते रखडले आहे. विहीर मंजूर झालेली असतानाही डार्क झोनच्या अडचणीमुळे शेतात विहीर खोदता येत नाही. एखाद्याने बळजबरीने विहीरीचे बांधकाम केले किंवा विंधन विहीर खोदण्याचा प्रयत्न केला तर गुन्हासुद्धा दाखल केला जाईल, अशी कायदेशीर तरतूद आहे.वर्षभरापूर्वी धामणगाव आणि चांदूर रेल्वे तालुक्यातसुद्धा असेच चित्र होते. तेथील बरीच गावे डार्क झोनमध्ये होती. परंतु या दोन्ही तालुक्यातील 104 गावे आता डार्क झोनमुक्त झाली आहेत. आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वात त्या भागातील शेतकऱ्यांनी त्यासाठी दिल्लीपर्यंत धाव घेतली. त्यामुळे केंद्रीय भूजल मंडळाने नव्याने भूजल मूल्यांकन करुन अलिकडेच सकारात्मक अहवाल दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुक्याची भूगर्भातील पाणी पातळी केंद्रीय भूजल मंडळाच्या मानकांपेक्षा कमी झाल्यामुळे 2004 पासून ही गावे डार्क झोन म्हणून जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे या भागातही विहिरी खोदता येत नव्हत्या. विहीरी खोदण्यासाठी कायदेशीर परवानगी नसल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठीही पाणी उपलब्ध होत नव्हते. अपवादात्मक स्थितीत सामुहिक विहीरीची परवानगी दिली जायची. परंतु ती विहीरसुद्धा दुसऱ्या विहीरीपासून किमान दीडशे मीटर दूर असणे आवश्यक होते. जर त्या भागात पिण्याच्या पाण्याची विहीर असेल तर अशा स्थितीत हे अंतर बिगर टंचाई क्षेत्रात 500 आणि टंचाई क्षेत्रासाठी एक किलोमीटर असे पाळावे लागत होते.
[ad_2]