कोपरगांव प्रतिनिधी : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिक्षणासाठी आपल्या पाल्याला दाखल केल्यास त्याला शेवटच्या वर्षी कॉलेज मार्फतच नोकरी मिळुन लाखो रूपयांचे वार्षिक पॅकेज मिळेल, हा पालकांचा आत्मविश्वास . विद्यार्थीही त्याच तळमळीने संजीवनी मध्ये प्रवेश घेवुन आपल्या करीअरच्या दृष्टीने प्रयत्न करतात. पालक व विद्यार्थ्यांच्या मनसुब्यांना सत्यात उतरविण्यासाठी संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभाग विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या संपर्कात राहुन आपल्या विद्यार्थ्यांकडून कंपन्यांच्या गरजेनुसार मुलाखतींची तयारी करून घेतो.
अशाच प्रयत्नातुन रिलायन्स इंडस्ट्रिज प्रा. लि. कंपनीचा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. यात अंतिम वर्षातील चार विद्यार्थ्यांची लाखोंच्या वार्षिक पॅकेजवर कंपनीने नोकरीसाठी निवड केली आहे, अशी माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की रिलायन्स कंपनीने निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरंगच्या विक्रम जालिंदर जगताप, शेखर सुदाम गायकवाड व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या स्वप्नील दिनकर अनप आणि विशाल दत्तात्रय पुंड यांचा समावेश आहे. रिलायन्स कंपनी कडून चांगले वार्षिक पॅकेज मिळणार या अनुषंगाने ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आपल्या विद्यार्थ्यांकडून मुलाखतींचा भरपुर सराव करून घेतला. यात कंपनीने गरजेनुसार चार नवोदित अभियंत्यांची निवड केली. कंपनीने नोकरीचे ठिकाण कळविताच चारही नवोदित अभियंते रिलायन्सच्या सेवेत रूजु होतील. संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.
मी श्रीरामपुर तालुक्यातील खोकर या खेडेगावातील शेतकऱ्याचा मुलगा. माझ्या मोठ्या भावाने संजीवनी मधुनच इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले आणि आज तो यशस्वी उद्योजक आहे. माझे वडील शेतकरी असले तरी त्यांना संजीवनी पॅटर्नची परंपरा माहिती होती. म्हणुन वडीलांनी मला पहिल्यांदा इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगचा डीप्लोमा करण्यासाठी संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निक मध्ये प्रवेश मिळवुन दिला. डीप्लोमाच्या शेवटच्या वर्षात मला चांगले मार्कही मिळाले. त्यामुळे मला डायरेक्ट सेकंड यिअरला कोणत्याही इंजिनिअरींग कॉलेजला प्रवेश मिळाला असता. परंतु संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज ऑटोनॉमस असल्याने व येथे उद्योगाभिमुख शिक्षण दिल्या जाते, हे मला माहित होते, तसेच येथिल विद्यार्थ्यांना कॉलेज मार्फतच नोकरी मिळुन लाखोंचे वार्षिक पॅकेज मिळते, हे मी पाहत होतो. म्हणुन संजीवनी मध्ये डीग्री पुर्ण करण्याचा निर्धार केला. आणि मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगची डीग्री पुर्ण केली. आणि शेवटच्या वर्षात असताना रिलायन्स कंपनीत लाखोंच्या वार्षिक पॅकेजची नोकरीही मिळाली. माझे व माझ्या पालकांचे स्वप्न संजीवनीने पुर्ण केले.-विशाल पुंड, विद्यार्थी.