अनिल वीर सातारा : जिल्हा भारतीय बौद्ध महासभा व विविध संघटनांच्यावतीने वर्षावास प्रवचन मालिका मोठ्या उत्साहात सुरु करण्यात आले. फुले,शाहू,आंबेडकर सामाजिक सभागृह, बुद्ध विहार कोळकी (फलटण) या ठिकाणी पूर्व विभागाच्यावतीने आषाढ पौर्णिमेचे उद्घाटन पूज्य भन्ते सुमेध बोधी ए, पूज्य भन्ते कश्यप, पूज्य भन्ते सुमंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा शाखा सातारा पूर्व अध्यक्ष नानासाहेब मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळीकार्यकारिणी,केंद्रीय शिक्षक,शिक्षिका,बौद्धाचार्य,समता सैनिक व तालुका शाखा पदाधिकारी,उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होते.पश्चिम विभागाच्यावतीने महाविहार, कराड येथे जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवचन मालिकेस सुरुवात करण्यात आली.
पंचशीला निवास,जकातवाडी येथील चंद्रकांत खंडाईत यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षावास कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.शाहिररत्न किरण जगताप,महादेव मोरे,दिलीप कांबळे,संतोष मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भीमबुद्ध गीते सादर करण्यात आली.विधि आबासाहेब दणाने ,केंद्रीय शिक्षक भागवत भोसले यांच्या अधिपत्याखाली पार पाडला. त्यास सुनील कदम यांनी साह्य केले.सम्यक ज्येष्ट नागरिक संघाचे बी.एल.माने यांनी प्रास्ताविक केले.प्रथमतः महापुरुषांच्या प्रतिमेस आयुनी पंचशीला चंद्रकांत खंडाईत या दाम्पत्यानी पुष्पहार अर्पण केला.याशिवाय अनिल वीर व बी.एल.माने यांनी पुष्पांजली अर्पण करून दीपप्रज्वलन केले.भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन मुरलीधर खरात यांनी केले.यावर बी.एल.माने यांनी स्पष्टीकरण केले.वर्षावास यासंबंधीची सविस्तर माहिती भागवत भोसले यांनी सांगितली.दरम्यान भन्ते म्हणून नंदकुमार काळे यांचे पुष्प वर्षावात स्वागत करण्यात आले. मिलिंद चंद्रकांत खंडाईत यांनी आभार मानले.शेवटी खिरदानाने सांगता करण्यात आली. सदरच्या कार्यक्रमास उपासक मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.
बोधिसत्व बुद्ध विहार, पाटण येथे तालुक्याच्यावतीने मोठ्या दिमाखात वर्षावास मालिका सुरू करण्यात आली. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष आनंदा गुजर होते.यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सचिव घनश्याम कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.तारळे विभागाच्यावतीने दीक्षाभूमी बुद्धविहारात माजी केंद्रप्रमुख गौतम माने यांचे प्रवचन झाले.कोडोली येथे जिल्हा सरचिटणीस दिलीप फणसे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.