औताडे पाटिल सोसायटीची बँक पातळीवर शंभर टक्के वसुली .. 

0

———- Forwarded message ———
From: Somnath Sonpasare <editorpressalert@gmail.com>
Date: Mon, 7 Jul 2025, 19:57
Subject: औताडे पाटिल सोसायटीची बँक पातळीवर शंभर टक्के वसुली ..
To: <dainiklokprabhatsatara@gmail.com>

कोपरगाव प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यात सहकाराची चळवळ प्रथम पोहेगावात उभी राहिली. 

 सन १९६९ साली स्व. चांगदेवराव औताडे यांनी  पोहेगाव बुद्रुक नंबर दोन विकास सोसायटीची स्थापना केली . नव्यानेच नामकरण झालेल्या श्री चांगदेवराव गणपतराव औताडे पाटील विकास सोसायटीची बँक पातळीवर शंभर टक्के वसुली झाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र औताडे यांनी दिली. 

संस्थेचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या मार्गदर्शनामुळे संस्थेने व्यापारी गाळ्यांची निर्मिती केली. . 14 जुलै रोजी संस्थेच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या दुधाला योग्य भाव मिळण्यासाठी दूध संकलन केंद्राची ही निर्मिती होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 संस्थेने वसुलीसाठी केलेल्या कामकाजाची माहिती घेत वसुलास पात्र असलेल्या सभासदांचे व संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व संचालक मंडळाचे अभिनंदन केले ‌.

संस्थेमध्ये २५५ सभासद असून १२१ कर्जदार सभासदांनी अहमदनगर जिल्हा बँकेकडून २ कोटी ६ लाख पर्यंत  कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड ३०/०६/२०२५ अखेर बँक पातळीवर सभासदांनी पूर्ण केली.याकामी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र औताडे, उपाध्यक्ष अशोक वाके,संचालक सुनिल बोठे,अनिल औताडे,  दिलीप  औताडे,  संजय  औताडे ,कैलास औताडे ,अनिल औताडे, सुनिल  हाडके ,सौ.सिमाताई  औताडे,सौ.यमुनाबाई  लांडगे,सोमनाथ सोनवणे,नितीन भालेराव , सचिव गोरक्षनाथ फटांगरे यांनी विशेष प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here