कोपरगाव प्रतिनिधी : सोसायटीच्या माध्यमातून कर्जदार सभासदांना पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज देऊन आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी संचालक मंडळांनी प्रयत्न केले. संस्थेच्या कर्जदार सभासदांनी ही सन 2024 /25 च्या वर्षअखेरीस जिल्हा बँकेला बँक पातळीवर शंभर टक्के वसूल दिला आहे. माधवराव बारकुजी पा. शिंदे वि. का सोसायटीची बँक पातळीवर शंभर टक्के वसुली झाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष संजय शिंदे,उपाध्यक्ष कचेश्वर रांधव, संस्थेचे संचालक मंडळ, संस्थेचे सचिव बाळासाहेब खांडगे,सह सचिव दादा गवारे, निलेश जाधव, अशोक मोराडे यांनी संस्थेची बँक पातळीवर वसुली होण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून कामकाज पाहिले होते. 30 जून 2025 अखेर संस्थेच्या सभासदांनी जिल्हा बँकेच्या वसुलीस पात्र असलेले एकूण पीक कर्ज 2 कोटी 72 लाख व मध्यम मुदतीचे कर्ज 1 लाख अदी कर्जाची बँक पातळीवर वसुली दिली. संस्थेचे सचिव बाळासाहेब खांडगे यांनी सांगितले की संस्थेचे एकूण 180 कर्जदार सभासद आहे. त्यांनी आपल्या क्षमतेनुसार पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज घेतले होते. त्याची परतफेड वर्ष अखेरीस सभासदांनी केली.
ReplyForwardAdd reaction |