देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :
पांडुरंग भक्तीभावाचा भुकेलेला आहे.भक्तीसाठी पैसा लागत नाही.मनोभावे सेवा केली तर पांडुरंग हि अंतकरणात स्थान निर्माण करतो.त्यासाठी अंतःकरणापासुन भक्ती करावी लागते.असे हभप विश्वंभर महाराज शिंदे यांनी सांगितले. देवळाली प्रवरा येथील श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज पायी दिंडी सोहळ्याची सांगता किर्तनसेवा युवा किर्तनकार हभप विश्वंभर महाराज शिंदे यांनी गुंफली.त्यावेळी श्रीकृष्णाची महती सांगताना आपल्या सुश्राव्य वाणीने भावीकभक्त व वारक-यांना मंत्रमुग्ध केले.
श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज पायी दिंडी सोहळ्याचे हे १४ वे वर्ष.देवळाली प्रवरा येथील सर्वधर्मीय ग्रामदैवत श्री बाबुराव पाटील महाराजांच्या पादुका घेवुन श्रीक्षेत्र देवळाली प्रवरा ते श्रीक्षेत्र पंढरपुर पायी दिंडी सोहळा वारी संपन्न करुन गावी परतला.आज गुरुपौर्णीमेच्या मुहुर्तावर दिंडीची सांगता झाली.यावेळी मोठ्या प्रमाणावर भावीकभक्त उपस्थितीत होते. श्री समर्थ बाबुराव पाटलांचा सर्वधर्मसमभावाचा संदेश सर्वदुर जावा यासाठी हा दिंडी सोहळा सुरु करण्यात आला. या दिंडीमार्फत वाटचालीत वृक्षारोपण करण्यात आले आहे.तसेच हि दिंडी प्लॅस्टीकमुक्त दिंडी म्हणुन ओळखली जाते.वाटचालीत शिस्त आणि स्वच्छता राखण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते.
सांगता कार्यक्रमांस दत्ता कडू पाटील, शिवराम कडु , देवराम कडु, एकनाथ पठारे, भाऊसाहेब गडाख,शिवाजी बोंबले,दत्तात्रय खांदे, विजय कुमावत, अशोक थोरे.मुकुंद सिनगर,किसन कानडे,बाळासाहेब खांदे, वैभव गिरमे , विश्वास पाटील, बापुराव कडु, हभप बाळासाहेब वाळुंज,बाळासाहेब लबडे,बेबीताई मुसमाडे,रत्नप्रभा कडु आदिंसह मोठ्या संख्येने भावीक भक्त उपस्थितीत होते. किर्तनानंतर भाविकांनी महाप्रसाद घेतला.दिंडी कमेटीचे अध्यक्ष दत्ता कडु पाटील यांनी दिंडी कमेटीसह सर्वांचे आभार मानत दिंडी सोहळ्याचा जमाखर्च उपस्थितांसमोर सादर केला.