पोहेगाव : कै. गणपतराव (दादा )रभाजी औताडे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यालयास माजी विद्यार्थी फाउंडेशन कडून फाउंडेशनचे कार्याध्यक्ष प्रदीप औताडे. सचिव एस. बी. देशमुख, उपाध्यक्ष अण्णासाहेब औताडे, कोषाध्यक्ष जनार्दन वाके, नंदकुमार औताडे यांनी पुस्तके भेट दिली.
गणपतराव दादांची पुण्यतिथी विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी गणपतराव दादांच्या पुतळ्याला अभिवादन करून मान्यवरांची मनोगते झाली. यावेळी अशोकराव रोहमारे, एम. टी. आबा रोहमारे प्राचार्य संजय शिंदे, प्रवीण शिंदे योगेश औताडे यांनी मनोगत व्यक्त केली.
गणपतराव दादांचे काम सहकार व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रातील पहिली सहकार सोसायटी पोहेगावमध्ये दादानी स्थापन केली. त्याचा आदर्श सपुर्ण राज्याने घेतला. शिक्षण क्षेत्रात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबत शैक्षणिक कामात स्वःताहाला झोकून दिले . आज बहुजन समाजातील हजारो विद्यार्थी येथुन शिक्षण घेऊन शाळेचे व गावाचे नाव मोठे केले .
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आजोबा-पंजोबा यांच्या सोबत बसून गणपतराव ( दादांनी ) केलेल्या कामाची माहिती घेऊन ही माहिती शाळेचे प्राचार्य संजय शिंदे यांच्याकडे जमा केल्यास दादांच्या जीवन चरित्राबद्दल व कार्याबद्दल अनेक पुस्तके तयार होतील व त्याचा आदर्श तालुक्यासह संपूर्ण राज्याला घेता येईल असे मान्यवरानी सांगीतले . यावेळी विद्यालयाचे सुपरवायझर नेहे सर शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.