कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये काळे -कोल्हे -परजणे -औताडे आघाडीची सरशी

0

सर्वच्या सर्व १८ जागा जिंकत विरोधकांचा सुपडा साफ                                                                                                                        
कोपरगाव- (प्रतिनिधी)
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी पूर्ण झाली असून त्यात आ. आशुतोष काळे, माजी आ. स्नेहलता कोल्हे, महानंदचे चेअरमन राजेश परजणे, नितीन औताडे आघाडीने बाजी मारत  सर्वच्या सर्व १८ जागा जिंकत विरोधकांचे आव्हान मोडून काढले आहे  यामध्ये  काळे गटाचे -०७  असून कोल्हे गटाचे-०७, परजणे गटाचे ०२ तर औताडे गटाचे -२, विजयी उमेदवारविजयी झाले
 विजयी उमेदवारांचे आ. आशुतोष काळे, माजी आ. स्नेहलता कोल्हे,संजीवनीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे, नितीन औताडे यांनी अभिनंदन केले आहे.  कोपरगाव पीपल्स बँकेच्या सभागृहात आज मतदानांनंतर काही वेळातच मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला .मतमोजणीच्या
 सुरवातीलाच मतदारांचा कल लक्षात यायला सुरवात झाली होती . तेव्हाच काळे -कोल्हे -परजणे – औताडे युतीच्या उमेदवारांनी आपली आघाडी घेतली होती .कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी आपल्या सहकाऱ्यासमवेत चोख बंदोबस्त ठेवला होता. मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. निकाल जाहीर होताच उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलाल उधळून जल्लोष केला
  कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता मात्र शिवसेना ठाकरे गट , काँग्रेस यांच्यामध्ये सहमती न झाल्याने निवडणूक  घेण्यात आली. मात्र विरोधक सक्षमपणे आव्हान उभे करू शकले नाही.                              
महिला मतदार संघ  कदम मीरा सर्जेराव-११४७,
(विजयी-औताडे  गट  ) जावळे गयाबाई धर्मा-१७१,डांगे माधुरी विजय-११३१, (विजयी- कोल्हेगट)बारहाते हिराबाई रावसाहेब – ९०, आदी मते मिळाली आहे. यात अवैध मते-१३ आहे.
सोसायटी मतदार संघात काळे गटास – ०३ कोल्हे गटास-०४, परजणे गटास – ०२ तर औताडे गट
– ०१ जागा मिळाली  आहे.
इतर मागासवर्ग मतदार संघ

पवार गिरीधर दिनकर – १५३, फेफाळे खंडू पुंजाबा-१११०, (विजयी, भाजप, परजणे) बिडवे दत्ता नामदेव – २१ आदी मते मिळाली आहे. यात अवैध मते २३ आहे.

गोर्डे प्रकाश नामदेव- ६३१, (विजयी, कोल्हे गट) दंडवते संजय काशीनाथ – ८८, निकोले राजेंद्र शंकर-६०८, (विजयी, काळे गट) पाडेकर विष्णू एकनाथ -८१
आदी मते मिळाली आहे.
व्यापारी मतदार संघाची आकडेवारी

कोठारी सुनीलकुमार गोकुलचंद – १०, खान नदीम महंमद रियाज अहमद- १५, ठक्कर संतोष
मंगलदास – ३१, धाडीवाल ललीतकुमार तेजपाल-६७,निकम रेवणनाथ श्रीरंग-६९,  भट्टड संजय श्यामलाल – ३०, शाह मनीष जयंतीलाल-५३,सांगळे ऋषिकेश मोहन – १०६,
यात अवैध मते-०१आहे.
हमाल, मापाडी मतदार संघ उमेदवार

मरसाळे अर्जुन भगवान – १७, शेळके जलदीप भाऊसाहेब -२१, साळुंके रामचंद्र नामदेव-४७
विजयी (कोल्हे गट)                                                                                                  
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार 

केकाण रामदास भिकाजी, (काळे गट) नवले
अशोक सोपान, (औताडे सेना), मोकळ रावसाहेब
रंगनाथ (काळे गट) .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here