क्लाऊड तंत्रज्ञान म्हणजे काय?
क्लाऊड तंत्रज्ञान म्हणजे आपल्या संस्थेसाठी आवश्यक सर्व संगणकीय सेवा ऑनलाईन व एका ठिकाणी उपलब्ध करुन देणे. त्याप्रमाणे elibrarycloud.com ही क्लाऊड तंत्रज्ञानावर आधारीत ऑनलाईन ग्रंथालय आज्ञावली असल्यामुळे ग्रंथालयाची सर्व माहिती क्लाऊड वरती साठविली जाते. त्यामुळे ग्रंथालयाची सर्व माहिती क्लाऊडवरती सुरक्षित राहते व माहितीचे बॅकअप घेण्याची आवश्यकता राहत नाही. ग्रंथपाल मोबाईलवरती ग्रंथालयाचे सर्व कामकाज करु शकतात. त्यामुळे ग्रंथपाल कुठेही असले तरी ग्रंथालयाची माहिती मोबाईलच्या सहाय्याने मिळवू शकतात.
तसेच वाचकांसाठी मोबाईल अॅप उपलब्ध आहे. वाचक मोबाईल वरती आवश्यक ग्रंथ विषयानुसार व लेखकानुसार शोधु शकतात व आरक्षित करु शकतात. तसेच शिल्लक ग्रंथ व पुर्वी वाचलेले ग्रंथ यादी पाहु शकतात.
elibrarycloud.com वरती पाच लाखांपेक्षा अधिक ग्रंथ माहिती, 7000 पेक्षा अधिक लेखक माहिती, 2000 पेक्षा अधिक प्रकाशन माहिती व 800 पेक्षा अधिक विविध प्रकारचे दैनिके व नियतकालिके माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रंथालयांना ग्रंथ नोंदणी करतांना ग्रंथाची सर्व माहिती नोंद करणे आवश्यक नाही; तसेच नियतकालिके हजेरी घेण्यासाठी व वर्गणी भरण्यासाठी नियतकालिकांची सर्व माहिती क्लाऊड वरती उपलब्ध असल्यामुळे ग्रंथालयांना अधिक मदत होते.
ग्रंथालयाचे अकौंटचे काम करतांना ग्रंथापलाने फक्त व्हावचर नोंद करणे आवश्यक असते; त्यावरुन लेखापरिक्षणास आवश्यक सर्व अभिलेख उदा. किर्द, खतावणी, जमाखर्च, व्हावचर फाईल इ. तयार होतात. तसेच क्लाऊड तंत्रज्ञानामुळे लेखापरिक्षक ऑनलाईन लेखापरिक्षण करु शकतात.
ग्रंथांचे वर्गीकरण, नियतकालिकांची माहिती आद्यावत ठेवणे इ. कामे हे आज्ञावलीचे तज्ञांमार्फत नियमित केले जाते. तसेच प्रशिक्षण व तांत्रिक सेवा आज्ञावलीच्या तज्ञांमार्फत पुरविले जाते. त्यामुळे आज्ञावलीद्वारे ग्रंथालयाचे अधिकाधिक काम सोपे करण्यात आले आहे.
ऑनलाईन वार्षिक अहवाल
ऑनलाईन पद्धतीने वार्षिक अहवाल थेट जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे वाचनालयाची अद्यावत माहिती उपलब्ध होईल.
संगणकाशिवाय संगणकीकरण
आज्ञावली क्लाऊड तंत्रज्ञानवर आधारीत असल्यामुळे ग्रंथपाल मोबाईल वरती काम करु शकतात व सर्व ग्रंथालयाचे उत्तम व्यवस्थापन करु शकतात. तसेच प्रिंट काढण्यासाठी वायरलेस प्रिंटर खरेदी करावा. त्यामुळे ग्रंथालयांकडे संगणक नसेल तरीही ग्रंथालय संगणकीकृत करता येते. त्यामुळे कमी गुंतवणूकीत वाचनालय संगणकीकृत होऊ शकते.
वाचकांसाठी मोबाईल अॅप
मोबाईल अॅपद्वारे वाचक घरबसल्या आवश्यक ग्रंथ लेखकाप्रमाणे, विषयाप्रमाणे किंवा नावाप्रमाणे शोधु शकतात. तसेच वाचकांना त्यांच्याकडे शिल्लक ग्रंथांची माहिती व पुर्वी वाचलेल्या ग्रंथांची यादी पाहता येईल.
आवश्यक सर्व अभिलेख उपलब्ध
वाचनालयास २६ प्रकारचे अभिलेख ग्रंथालयामधे ठेवावे लागतात. आज्ञावलीद्वारे संगणकीकरण केल्यास सर्व अभिलेख/माहिती पत्रके/यादी तयार होईल. त्यामुळे अतिरिक्त काम व वेळ वाचते. तसेच छापिल अभिलेख/पत्रके खरेदी करण्याची आवश्यकता नाही.
वाचनालयांना संजीवनी
आज्ञावलीद्वारे सर्व ग्रंथालय व्यवस्थापन उत्तम पद्धतीने करणे शक्य असल्यामुळे ग्रंथालयात उच्च शिक्षिती कर्मचारी असणे आवश्यक नाही. केवळ एक कर्मचारी सर्वग्रंथालयाचे कामकाज करु शकतो.
वाचनालय ही वाढत जाणारी संस्था आहे, म्हणजेच वाचनालयात दरवर्षी ग्रंथ संख्या वाढत जाते. हजारो ग्रंथांमधुन वाचकांना आवश्यक ग्रंथ शोधुन देणे कठीण असते. त्यामुळे ग्रंथ शोधण्यासाठी अधिक वेळ जातो. त्यामुळे वाचनालय सेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
वैशिष्टे व फायदे
1.संगणकाशिवाय संगणकीकरण शक्य
2.ग्रंथ भांडारमधे पाच लाखांपेक्षा अधिक ग्रंथ असल्यामुळे जलद ग्रंथ नोंद करता येते.
3.जलद ग्रंथ शोध करता येते.
वाचकांसाठी ग्रंथ शोध करण्यासाठी मोबाईल अॅप उपलब्ध आहे.
4.ग्रंथपालास अकौंटचे ज्ञान असणे आवश्यक नाही.
5.ग्रंथपालाने फक्त व्यवहार नोंद केल्यास ग्रंथालयाचे अधिकाधिक पत्रके आज्ञावली करते.
6.कमी कर्मचा-यासह ग्रंथालय चालवणे शक्य आहे.
लेखक
श्री संभाजी मोहन वाळके , ग्रंथपाल
श्री त्रिंबकराज मोफत वाचनालय ,देवळाली प्रवरा नगरपरिषद (मोबाईल 9921009748)