प्रोफेसर कॉलनी चौकातील कचरा संकलन इतरात्र हलवावे

0

शिवसेना विभागप्रमुख काका शेळके यांचे मनपा आयुक्तांना निवेदन

     नगर – प्रोफेसर कॉलनी चौक येथे छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारणेपूर्वी त्या परिसरात असलेला अहमदनगर महानगरपालिकेचा कचरा संकलन डेपो हलविण्यात येऊन तेथील घाण, दुर्गंधी दुर करुन स्वच्छता करण्यात यावी, या मागणीचे निवेदन शिवसेना सावेडी विभागप्रमुख चंद्रकांत (काका) शेळके यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.

     निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर महानगरपालिकेने प्रोफेसर चौक येथे  छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा उभारण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. परंतु या परिसरात  अहमदनगर महानगर पालिकेचा कचरा संकलन डेपो असुन या ठिकाणी उपनगराततील कचरा संकलन करणार्‍या गाड्या उभ्या राहतात. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. या दुर्गंधीचा  परिसरातील नागरिकांना  खुप त्रास होत आहे.  त्यामुळे या परिसरातील कचरा डेपो हलवुन हा परिसर दुर्गंधीमुक्त करावा. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचे पुतळ्याच्या सर्व बाजूंनी सुशोभिकरण करून हा परिसर पूर्णतः स्वच्छ ठेवावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here