कोपरगाव ( वार्ताहर) कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नितीन बडदे यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते.शिबिरात एकूण ४१ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पार पडल्या शिबिरासाठी बीड येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर मुंडे व त्यांचे सहाय्यक संदीप पाखरे यांचा विशेष सहभाग होता.
शिबिरा संदर्भात कोणती माहिती लाभार्थ्यांना द्यावयाची आहे, त्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लाभार्थ्यांकडून घ्यावयाची आहे या संबंधातील सर्व सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून संबंधित कर्मचाऱ्यांना वेळोवेळी देण्यात येत होत्या. शिबिरादरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या आशा सेविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता शिबिरासाठी सर्वात जास्त लाभार्थी आशा सेविकांद्वारे उपलब्ध करण्यात आले होते. सध्या कडक उन्हाळा असल्याकारणाने लाभार्थी तसेच लाभार्थ्यांसमवेत आलेले नातेवाईक यांच्यासाठी बसण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडून योग्य पद्धतीने करण्यात आली होती. शिबिरासाठी चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास पेशंट ट्रान्सपोर्टेशन(patient transportation ) साठी व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. शिबिरादरम्यान माजी पंचायत समिती बाळासाहेब राहणे यांनीही भेट देत डॉक्टरच्या कार्याचे कौतुक केले. आरोग्य सहाय्यिका श्रीमती भांड ह्या या महिना अखेर सेवानिवृत्त होत असतानाही शिबिरामधील त्यांचा नेहमीप्रमाणे ऊत्स्फुर्त सहभाग सर्वांचे लक्ष वेधुन घेत होता.
शिबिर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन बडदे यांच्या बरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत सि.एच.ओ आरोग्य सहाय्यक ,आरोग्य सहाय्यिका, गटप्रवर्तक लॕब टेक्निशियन, फार्मसीस्ट मॅडम, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा सेविका, पी एच सी कर्मचारी श्री प्रशांत गवळी व श्री विजय गोसावी यांनी विशेष मेहनत घेतली.
सायंकाळी सहा वाजता प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सर्व लाभार्थ्यांची घरी जाण्यासाठी ची व्यवस्था करण्यात आली होती. योग्य नियोजन, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था, सर्व कर्मचाऱ्यांचे योग्य ते सहकार्य यामुळे लाभार्थ्यांसमवेत आलेल्या सर्व नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले तसेच त्यांच्याकडून भविष्यात आरोग्य केंद्राअंतर्गत होणाऱ्या शिबिरास लाभार्थी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उपस्थितांना देण्यात आले.