देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :
राहुरी तालुक्याची कामधेनू समजल्या जाणाऱ्या डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे साखर कारखान्यावर जिल्हा बँकेने कर्जाच्या वसुलीसाठी जप्तीची कार्यवाही केल्याने कामगारांचे काम बंद झाल्या पासुन सहा ते सात महिन्यात कामगारांची वाईट परिस्थिती झाली आहे. कामगारांना वर्ग अडचणीत सापडला आहे. यासंदर्भात साखर कामगार युनियन व कृत समितीचे आज बैठक संपन्न झाले आहे. या बैठकीत प्रमुख पाच मुद्दे मांडण्यात आले त्यामध्ये कारखान्याने कामगारांचे 17 पगार व फंडाचे हप्ते देण्याची व्यवस्था करावी कारखाना व्यवस्थापन प्रशासक व जिल्हा बँकेला मागण्यांचे निवेदन देण्यात येणार असून सात दिवसांच्या आत कुठलाही ठोस निर्णय न झाल्यास जन आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
कारखाना कार्यस्थळावरील लक्ष्मीनारायण मंदिराच्या आवारात कामगार युनियन कृती समिती व सर्व कामगारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला कायम व मजूर हजेरी वरील कामगार तसेच सेवानिवृत्त कामगार मोठ्या संख्यने उपस्थित होते.
या बैठकीत कामगारांच्या विविध मागण्या व पगार संदर्भात चर्चा संपन्न झाली जिल्हा बँकेने 100 कोटी साठी कारखाना ताब्यात घेतल्यानंतर कामगारांचे काम बंद झाल्यापासून सहा ते सात महिने पासुन कामगार वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच कारखाना वसाहती मधील वीज पाणी स्वस्त धान्य दुकानात ही संदर्भात अशा विविध महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली.
डॉ.तनपुरे साखर कारखान्याकडून कर्जाची परतफेड न झाल्याने व पुनर्गठन कराराचा भंग केल्याने जिल्हा बँकेने कारखाना सिल केला. या कारवाईने कामगार वर्गात एकच खळबळ उडाली होती
यावेळी सचिन काळे, सुरेश थोरात, खुळे मामा ,चंद्रकांत कराळे, अर्जुन दुशिंग यांनी भूमिका मांडली.तर युनियनचे माजी अध्यक्ष इंद्रभान पेरणे यांनी आपल्या कष्टाचे पैसे मिळाले पाहिजे. आज आपल्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सत्ताधारी व्यवस्थानाच्या काळातील सर्व थकीत पगार मिळावे व ले ऑफ बाबत व्यवस्थापनाची भूमिका स्पष्ट होणे अपेक्षित असून कारखाना प्रशासक यांना निवेदन देण्यात येणार असून येत्या सात दिवसात मागण्यांचा विचार झाला नाही तर तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा देण्यात आला.वेळप्रसंगी उपोषण जन आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालेल जनआंदोलनाच्या भूमिकेस कामगार बांधवांनी हात उंचावून प्रतिसाद दिला. सर्व कामगार आंदोलनात सक्रिय राहणार असल्याची कामगारांनी ग्वाही दिली.
यावेळी युनियनचे अध्यक्ष गजानन निमसे, सीताराम नालकर, बाळासाहेब तारडे, ईश्र्वर दुधे, राजेंद्र गागरे व सर्व युनियनचे पदाधिकारी आदिंसह कामगार उपस्थित होते.
कामगार युनियन गरज सरो वैद्य मरो !
डाँ.तनपुरे कारखान्यावर खा.डाँ.सुजय विखे यांच्या अधिपत्याखालील संचालक मंडळ असताना कामगार प्रतिनिधी म्हणुन इंद्रभान पेरणे यांच्या नेतृत्वाखाली
5 सष्टेंबर 21 ला उपोषण व विविध आंदोलने केली.दरम्यान पेरणे सह इतर कामगारांवर गुन्हे दाखल झाले.आंदोलनाची तिव्रता वाढल्याने खा.डाँ.विखे यांनी कामगारांच्या मागण्या मान्य केल्या. कामगारांच्या बैठकीत 21 डिसेंबर 21 ला कामगार युनियनच्या अध्यक्षपदी पेरणे यांची निवड करण्यात आली. याच दरम्याने कामगारांच्या पगार व इतर मागण्यासाठी कार्यकारी संचालक यांना नोटीस पाठवली. सत्ताधारी संचालक मंडळ व डाँ.खा.विखे यांनी कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन कामगार युनियनच्या अध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्यास लावले.18 एप्रिल 22 ला कामगारांनी कामगार युनियनचा अध्यक्षपदी इंद्रभान पेरणे यांनाच ठेवण्याची भुमिका घेतली.कामगार युनियनने हि कामगारांच्या होकारात हो केला. परंतू कामगार युनियनच्या बैठकीत पेरणे यांच्या जागी गजानन निमसे यांची निवड करुन कामगारांना झटका तर सत्ताधारी संचालक मंडळास दिलासा दिला.युनियनच्या नविन निवडी मागे संचालक मंडळाचा व राजकीय वरदहस्ताचा हात होता.कामगार युनियने आंदोलना दरम्यान पेरणे यांचा वापर करुन घेवून गरज सरो वैद्य मरो अशी भुमिका घेवून पेरणे यांना पदावरुन हटवले होते.कामगार आंदोलनासाठी परखड भुमिका घेणारा एक हि युनियचा पदाधिकारी आज युनियनमध्ये नाही.