परिपाठ /पंचांग /दिनविशेष

0

🎤परीपाठ 📜

_*❂ 📆दिनांक :~ 27 / 06 /  2023 ❂*_

    _वार ~ मंगळवार

      _*🏮 आजचे पंचाग 🏮*_
━═•●◆❃★❂★❃◆●•═━

आषाढ. 27 जून
तिथी : शु. नवमी (मंगळ)
नक्षत्र : हस्त,
योग :- वरियन
करण : बालव
सूर्योदय : 05:50, सूर्यास्त : 07:11,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🖊️सुविचार 🖊️
┅━═▣◆★✧★◆▣═━┅

💡व्यवहारात रोख अन कामात चोख असणारी माणसे जगाच्या बाजारात आपली किंमत राखुन असतात…!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
म्हणी व अर्थ

📌अति शहाणा त्याचा बैल रिकामा

🔍अर्थ:-
अति शहाणपण नुकसानकारक ठरते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 दिनविशेष 📆

🌞या वर्षातील🌞 178 वा दिवस आहे.

_*📕 महत्त्वाच्या घटना 📕*_

👉१६९३: लंडनमध्ये पहिले महिला मासिक द लेडीज मर्क्युरी प्रकाशित केले गेले.
👉१९५०: अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.
👉१९५४: अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युतकेंद्र (क्षमता: ५००० किलो वॅट) रशियातील मॉस्कोजवळ ओब‍निन्स्क येथे सुरू झाले.
👉१९६४: साली दिल्ली येथील तीन मूर्तिच्या भवनामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे संग्रहालय बनवण्याचा निर्णय घेण्यात आला.
👉१९९६: अर्थतज्ञ द. रा. पेंडसे यांना ’महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चा ’चिंतामणराव देशमुख पुरस्कार’ जाहीर
👉२००२: परमाणु शस्त्र नष्ट करण्याच्या रशियाच्या योजनेस जी-८ देशांनी आपली सहमती दर्शविली.
👉२००८: साली मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बिल गेट्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

_*💐जन्मदिवस / जयंती💐*_

👉१८३८: बंकिमचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार. त्यांनी लिहिलेल्या ’आनंदमठ’ या कादंबरीत ’वंदे मातरम’ हे गीत असून या गीताने स्वातंत्र्यलढ्यातील सहभागींना प्रेरणा मिळाली. (मृत्यू: ८ एप्रिल १८९४)
👉१८६४: शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार (मृत्यू: २७ सप्टेंबर १९२९)
👉१८६९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन प्राणीशास्त्रज्ञ हॅन्स स्पेमन यांचा जन्म.
👉१८७५: दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त’ (मृत्यू: १३ मार्च १८९९)
👉१८८०: हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका, राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका (मृत्यू: १ जून १९६८)
👉१९१७: खंडेराव मोरेश्वर ऊर्फ ’खंडू’ रांगणेकर – आक्रमक डावखुरे फलंदाज (मृत्यू: ११ आक्टोबर १९८४)
👉१९२२: ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय तामिळ भाषिक लेखक, कादंबरीकार, लघुकथा लेखक, पत्रकार, व्यंगचित्रकार, प्रवासी लेखक, नाटककार आणि पटकथा लेखक अकिलन यांचा जन्मदिन.
👉१९३९: राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार (मृत्यू: ४ जानेवारी १९९४)
👉१९६२: भारतीय-कॅनडातील उद्योगपती सुनंदा पुष्कर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१४)

  _*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*_

👉१७०८: धनाजी जाधव – मराठा साम्राज्यातील सेनापती (जन्म: ? ? १६५०)
👉१८३९: महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक (जन्म: १३ नोव्हेंबर १७८०)
👉१९५७: हर्मन बुहल – फ्रिट्झ विंटरस्टेलर, मार्कस श्मक, कर्ट डिमबर्गर यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक (जन्म: २१ सप्टेंबर १९२४)
👉१९९६: अल्बर्ट आर. ब्रोकोली – ’जेम्स बाँड’ पटांचे निर्माते (जन्म: ५ एप्रिल १९०९)
👉१९९८: होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार (जन्म: ९ फेब्रुवारी १९१७)
👉२०००: द. न. गोखले – शिक्षणतज्ञ व चरित्रकार (जन्म: ? ? ????)
👉२००२: भारतीय उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन.
👉२००८: फील्ड मार्शल सॅम माणेकशा (जन्म: ३ एप्रिल १९१४)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🥇सामान्य ज्ञान 🥇
┅━═▣◆★✧★◆▣═━┅

👉तेलबियाचा राजा कोणत्या पिकाला म्हणतात ?
🥇भुईमूग

👉महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे
🥇पुणे

👉कोणत्या शहराला भारत देशातील पेरिस असे म्हणतात?
🥇मुंबई

👉’हिंद केसरी’ हा प्रसिद्ध चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
🥇कुस्ती

👉भारतात कोणत्या पिकाचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते?
🥇तांदूळ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📻 बोधकथा 📻

🔸आत्म नियंत्रणाचे महत्त्व 🔸

एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्‍ट शिकण्‍यास तयार होत असे. त्‍याने धनुष्‍यबाण तयार करण्‍यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्‍याच्‍यात अहंकार आला, तो आपल्‍या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्‍य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्‍यांनी जेव्‍हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्‍हा त्‍यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्‍यावी जी आतापर्यंतच्‍या कलांमध्‍ये श्रेष्‍ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्‍याच्‍याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्‍ही कोण आहात. बुद्ध म्‍हणाले,”मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.” मुलाने यावर त्‍यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्‍हणाले,”जो धनुष्‍यबाण वापरतो त्‍याला त्‍याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्‍याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्‍वत:वर नियंत्रण ठेवतो,” मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्‍हणाले, ” जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्‍यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्‍य तर स्‍वत:ला नियंत्रणात ठेवण्‍याचे असते.

🧠तात्‍पर्य :- ज्‍यांना स्‍वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्‍याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परि‍स्थितीत आपल्‍याला आनंदी ठेवतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✒️सेक्रेटरी :-बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर, जि. नाशिक.
✒️मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर.
✒️सचिव :- नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ. नाशिक
✒️समन्वयक :- नाशिक व अहमदनगर जिल्हा संस्थाचालक महामंडळ.
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here