परीपाठ/पंचाग /दिनविशेष

0


सौ सविता देशमुख . पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता सिन्नर (नाशिक) मो .नं . 9511769689

_*❂ 📆दिनांक :~ 03 ऑगस्ट 2023 ❂*_

    ❂🎴 वार ~ गुरूवार 🎴❂

      _*🏮 आजचे पंचाग 🏮*_
━═•●◆❃★❂★❃◆●•═━

श्रावण. 03 ऑगस्ट
तिथी : कृ. द्वितीया (गुरू)
नक्षत्र : धनिष्ठा,
योग :- सौभाग्य
करण : वणिज
सूर्योदय : 06:04, सूर्यास्त : 06:55,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🖊️सुविचार 🖊️
┅━═▣◆★✧★◆▣═━┅

💡”सर्वात सुक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते म्हणजे ‘विचार’ कारण उध्वस्त आणि परिवर्तन करण्याची शक्ती विचारात आहे.”
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
म्हणी व अर्थ

🐦कावळ्याच्या शापाने गाय🐄 मरत नाही.

🔍अर्थ:-
क्षुद्र मानसांनी केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नसते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 दिनविशेष 📆

🌞या वर्षातील🌞 215 वा दिवस आहे.

_*📕 महत्त्वाच्या घटना 📕*_

👉२००४ : राज्यपाल महंमद फझल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्‍घाटन झाले. १ ऑगस्ट २००४ रोजी या विद्यापीठाची स्थापनाझाली होती.
👉१९९४ : संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर
👉१९९४ : सहज सोप्या व गोड कविता आणि सूक्ष्म व मार्मिक वर्णनात्मक लेख यांद्वारे हिन्दी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना उत्तर प्रदेश सरकारतर्फे विषेश पुरस्कार जाहीर.
👉१९४८ : भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.
👉१९३६ : आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्‍या ’महाराष्ट्रीय कलोपासक’ या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.
👉१९०० : ’द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी’ ची स्थापना झाली.
👉१७८३ : जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे ३५,००० जण मृत्यूमुखी पडले.

_*💐जन्मदिवस / जयंती💐*_

👉१९५६ : बलविंदरसिंग संधू – १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू
👉१९२४ : लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार (मृत्यू: २१ जून २००३)
👉१९०० : क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (मृत्यू: ६ डिसेंबर १९७६)
👉१८९८ : उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार. त्यांनी पंजाब विद्यापीठातून’शास्त्री’ आणि कलकत्ता विद्यापीठातून ’काव्यतीर्थ’ या उपाध्या मिळवल्या. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६६)
👉१८८६ : मैथिलिशरण गुप्त – हिन्दी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली. (मृत्यू: १२ डिसेंबर १९६४)

  _*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*_

👉२००७ : सरोजिनी वैद्य – लेखिका (जन्म: १५ जून १९३३)
👉१९९३ : स्वामी चिन्मयानंद सरस्वती – अध्यात्मिक गुरू (जन्म: ८ मे १९१६)
👉१९५७ : देवदास गांधी – पत्रकार, ‘हिन्दुस्तान टाइम्स‘चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव (जन्म: २ आक्टोबर? १९०० – दरबान, दक्षिण अफ्रिका)
👉१९३० : व्यंकटेश बापूजी केतकर – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद (जन्म: १२ जानेवारी १८५४)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🥇सामान्य ज्ञान 🥇
┅━═▣◆★✧★◆▣═━┅

👉अंदमान निकोबार हा अनेक बेटांचा समूह असलेला संघराज्य प्रदेश कोणत्या समुद्रात आहे?
🥇 बंगालचा उपसागर

👉भारतातुन कोणता आजार हा समुळ नष्ट झाला आहे?
🥇पोलिओ

👉भारत देशातील संसदगृहाचे नाव काय आहे?
🥇संसद

👉पणजी या शहराचे जुने नाव काय होते?
🥇पंजीम

👉लोकमान्य टिळकांनी कोणत्या ग्रंथाचे लेखन कार्य केले?
🥇गितारहस्य
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📻 बोधकथा 📻

💎 हिऱ्यापेक्षा जनता महत्वाची👥👥

एक राजा होता. त्‍याचे सुखी व संपन्न राज्‍य होते. दुर्दैवाने एकदा त्‍याच्‍या राज्‍यात पाऊसच पडला नाही. त्‍यामुळे दुष्‍काळाचे संकट उभे ठाकले. गरिबांचे हाल होऊ लागले. बादशहाने आपला खजिना जनतेसाठी खुला केला. एकेदिवशी तो खजिनाही संपला. आता पुढे काय हा प्रश्‍न राजासमोर उभा ठाकला. प्रजाजनांचे पोषण कसे करता येईल ही एकच चिंता राजाला सतत सतावित होती. त्‍याने त्‍याच्‍या बोटातली हि-याची अंगठी नोकरांना दिली व सांगितले,” ही अंगठी घेऊन शेजारच्‍या देशात जा, तेथील राजाला आपली सर्व परि‍स्थिती सांगा. तो राजा आपली अवस्‍था जाणेल व हा हिरा फार दुर्मिळ आहे. या हि-याच्‍या बदल्‍यात त्‍याच्‍याकडून धान्‍य मागून आणा व जनतेत वाटप करा. ” मंत्र्यांनी राजाला विचारले,”राजन, इतका महागडा, दुर्मिळ हिरा तुम्‍ही का विकत आहात, दुसरी काहीतरी सोय करता येईल.” राजा म्‍हणाला,”माझे राज्‍य ही माझी संपत्ती आहे. प्रजा उपाशी मरत असताना मी महागडा हिरा का सांभाळत बसू. प्रजा आहे तर मी आहे. असे हिरे पुन्‍हा प्राप्‍त करता येतील पण प्रजा एकदा जर नाराज झाली तर पुन्‍हा अशी प्रजा मला मिळणार नाही.”

🧠तात्‍पर्य :-
आपल्‍या हाती जर सत्‍ता असेल तर त्‍याचा योग्‍य विनियोग कसा करता येईल हे पहाणे इष्‍ट ठरते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✒️सेक्रेटरी :-बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर, जि. नाशिक.
✒️मुख्याध्यापक :- पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी, ता. सिन्नर. जि . नाशिक
✒️सचिव :- नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ. नाशिक
✒️समन्वयक :- नाशिक व अहमदनगर जिल्हा शिक्षण संस्थाचालक महामंडळ.
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here