पैठण,दिं.१४.(प्रतिनिधी) : लोकनेते महाराष्ट्र राज्याचे रोहयो व फलोत्पादन तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपानजी भुमरे व जिल्हा परीषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती तथा शिवसेना युवानेते विलासबापू भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण तालुक्यातील वडजी विविध विकास सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली.
वडजी विविध विकास सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी देविदास ताकपीर तर व्हाईस चेअरमनपदी मधुकर झिने यांची बिनविरोध निवड झाली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री खिस्ती व श्री इंगळे साहेब यांनी काम पाहिले सदरील निवड बिनविरोध झाल्या बद्दल शिवसेना युवानेते तथा सरपंच भाऊसाहेब दादा गोजरे पाटील, डॉ बाबासाहेब आण्णा गोजरे,रेणुका- शरद सहकारी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सुभाष बाबा गोजरे पाटील, भाऊसाहेब जिजा गोजरे, सुभाष आबा गोजरे, राजु नाना गोजरे, कल्याण ताकपीर, कैलास सुकासे ,गोविंद गोजरे ,आबासाहेब गोजरे ,संतोष वाघमारे ,योगेश झरकर, रामेश्वर गोजरे ,बाळु झिने, मोहन ताकपीर, विष्णू ताकपीर यांनी अभिनंदन केले आहे.