दि.१९, औरंगाबाद (प्रतिनिधी) दि. १३ ऑगस्ट हा दिवस जागतिक अवयवदान दिवस म्हणून साजरा केला जातो. अवयवदानानिमित्त जनजागृती करणे, याविषयी असलेले समज गैरसमज दुर करणे, गरजू रुग्णांना कमी वेळेत अवयव मिळावेत यासाठी प्रयत्न करणे हे यामागचे हेतू आहेत. डॉ. प्रदीप सारुक (किडनीविकारतज्ञ) यांनी सांगितले कि भारतात सद्यपरिस्थितीत ३.१७ लाख रुग्ण विविध अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत, त्यापैकी सुमारे १.७५ लाख रुग्णांना किडनीची आवश्यकता आहे.भारतात अवयवदानाचे प्रमाण हे फार कमी आहे (१० लाख लोकसंख्येमागे फक्त ०.१६) त्यामुळे अवयव मिळण्यासाठीचा कालावधी अंदाजे ४ ते ६ वर्ष इतका आहे जी चिंतेची बाब आहे.मराठवाड्यात ३१८ रुग्ण किडनीच्या तर ५१ जण लिव्हरच्या प्रतीक्षेत आहेत असे विशाल नरवडे (अवयव प्रत्यारोपक समन्वयक) यांनी सांगितले.
एका व्यक्तीच्या अवयवदानाने आठ जणांना जीवनदान मिळू शकते म्हणून जास्तीत जास्त लोकांनी, मेंदू मृत झाल्यानंतर (Brain Dead) अवयवदानासंबांधि वचनपत्र (Organ Donation Pledge Form) भरावा व अवयवदानाचा निर्धार करावा असे आवाहन डॉ. अजय रोटे (MS) यांनी केले आहे. स्वतःहून स्वयंसेवक म्हणून पुढे या उणीव भरून काढण्यासाठी अधिक अवयवदानाची गरज आहे असा संदेश डॉ. उन्मेष टाकळकर (CMD) सरांनी दिला.
डॉ. राहुल रुईकर (किडनीविकारतज्ञ) तसेच डॉ. अरुण चिंचोले (किडनी प्रत्यारोपणतज्ञ) हे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते.
डॉ. मनीषा टाकळकर व मनोज रॉय यांनी या कार्यक्रमास मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी २०० हुन अधिक व्यक्ती आवर्जुन उपस्थित होत्या ज्यात ५० हुन अधिक किडनीदाते होते, त्यांचा यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अनेक किडनी दात्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना केयर सिग्मा हॉस्पिटलच्या संपूर्ण सहकार्याबद्दल आभार प्रदर्शन केले.
केअर सिग्मा हॉस्पिटलमध्ये विविध वैद्यकीय तज्ञांच्या टीम मध्ये नव्याने डॉ. शरद बिरादार कन्सलटंट फिजिशियन-जनरल मेडिसिन अँड इंटेनसिविस्ट ) व डॉ. राहुल रुईकर (कन्सल्टंट-नेफ्रोलॉजिस्ट) हे रुजू झाले आहेत