कोपरगाव : कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) K. B. Rohmare Junior College महाविद्यालयात शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर जलजीवन मिशन यांच्या वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी कोपरगांव तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी शबाना शेख, प्रशांत शिंदे, सचिन म्हस्के, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव हे उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी ‘पाणी बचत, महत्व व संवर्धन’ या विषयांवर स्पर्धक विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. या स्पर्धेसाठी श्री. छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय कोळपेवाडी, एस.एस.जी.एम. महाविद्यालय, कोपरगाव, श्री.ग.र.औताडे कनिष्ठ महाविद्यालय पोहेगाव, राधाबाई काळे महिला महाविद्यालय, कोळपेवाडी व इतर कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक व स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांची निवड अहमदनगर येथे संपन्न होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी होणार असल्याची माहिती सचिन म्हस्के यांनी दिली आहे. या स्पर्धेच्या परिक्षणाचे काम डॉ. संजय दवंगे, प्रा. कर्पे सर, प्रा. उमाप मॅडम यांनी केले. उद्घाटन सत्र कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उप-प्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी जलजीवन मिशनच्या विविध उपक्रमांचा परिचय करून देतानाच वक्तृत्व स्पर्धेचा उद्देश्य नमूद केला..
सुत्रसंचालन प्रा. मधुमिता निळेकर यांनी तर आभार प्रा. जे. आर. भोंडवे यांनी मानले. ही स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रा.ए.एफ.सुर्यवंशी, प्रा.जी.ए.जेजुरकर, प्रा.दिपक बुधवंत, प्रा.निखिल लोंढे, प्रा.अभिजित वाघ, प्रा.बी.मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेसाठी आयोजक महाविद्यालयाबरोबरच इतर महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते