कोपरगाव (प्रतिनिधी) : नाशिक नगर जिल्ह्यात पोळ्याच्या अगोदर लाल कांद्याचे पीक घेण्याचे प्रमाण जास्त असते. मात्र यावर्षी वातावरणातील बदलामुळे कांदा पीक अडचणीत आले आहे. पोळ कांद्याचे उत्पादन येवला कोपरगाव तालुका हद्दीत जास्त प्रमाणावर घेतले जाते . मात्र यावर्षी कांदे लावल्यानंतर आलेल्या पावसाने कांद्यांना जोडपले. त्यामुळे वाफ्या मध्ये लावलेले कांदे कमी झाले.
सततच्या मावाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत सापडला असल्याचे केशवराव जाधव यांनी सांगितले . शेतकऱ्यांना एकरी कांदा शेतीची मशागतीसह काढणीपर्यंत पन्नास हजार रुपयांच्या आसपास खर्च येतो. चालू वर्षी मात्र या कांद्याचे उत्पन्न सरासरी पेक्षा कमी निघण्याचे चिन्ह दिसत आहे. एकरी 100 ते 125 क्टल उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्यांचे कांद्याचे उत्पन्न यावर्षी 50 ते 55 क्विंटल च्या आसपास येणार असल्याने त्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.
शेतकऱ्यांच्या या आर्थिक तोट्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलावीत. प्रत्येक महसूल सर्कल अंतर्गत कृषी विभाग व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या कांद्याची पाहणी करून उत्पन्न किती कमी झाले याचा अहवाल सरकार कडे सादर करावा. व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी माजी उपसरपंच केशवराव जाधव यांनी केली आहे.