आर जे एस फार्मसी महाविद्याल कडून ऑनलाईन राज्यस्तरीय ई-पोस्टर स्पर्धेचे आयोजन

0

स्पर्धेला राज्यभरातील विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद

कोपरगाव प्रतिनिधी :
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन संचलित फार्मसी महाविद्यालयातर्फे नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे च्या निमित्ताने राज्यस्तरीय ऑनलाईन ई-पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी पालघर ,मुंबई ,पुणे ,छत्रपती संभाजी,कोल्हापूर नगर ,नाशिक ,नांदेड ,बीड ,लातूर अहिल्यानगर आदी शहरातील फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.  स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील फार्मसी कॉलेजमधून १६२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये ४५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना व्हिडिओ बनवण्यास सांगण्यात आले.  नंतर त्याचे परीक्षण करून आणि विद्यार्थ्यांच्या गुणांनुसार तीन पारितोषिक देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविणारी ही स्पर्धा ठरली.

या स्पर्धा साठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन संचलित फार्मसी महाविद्यालयातर्फे पारितोषिक म्हणून रोख रक्कम  व प्रमाणपत्र देण्यात आले.
प्रथम पारितोषिक रुपये तीन हजार श्रुती नरवडे (एमव्हीपी कॉलेज ऑफ फार्मसी नाशिक) द्वितीय पारितोषिक रुपये दोन हजार वैष्णवी लोढा (आर.जे.एस. कॉलेज ऑफ फार्मसी कोपरगाव)  आणि तृतीय पारितोषिक रुपये एक हजार श्रुती गवळी (मुळा एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी सोनई) येथील विद्यार्थ्यांना देण्यात आले.

 

This image has an empty alt attribute; its file name is IMG-20250222-WA0003-1-1.jpg

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष मा. चांगदेव कातकडे ,सचिव.प्रसाद कातकडे ,प्रसिद्ध उद्योजक.विजय कडु,इंजिनीयर.दिपक कोटमे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.नितीन जैन ,उपप्राचार्य सौ.उषा जैन यांनी स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले यावेळी विजय कडु सर यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून उच्च पदावरती जाण्याचे आवाहन केले. तसेच प्राचार्य डॉ. नितीन जैन सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आजच्या युगात औषधशास्त्राचे शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण तेच आपल्याला हे उत्तम औषध तज्ञ बनवते यामुळे आपण आपल्या समाजाच्या आरोग्याला प्रोत्साहन देऊ शकतो तसेच समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे कार्य करू शकतो असे विद्यार्थ्यांना संबोधित केले. स्पर्धेचे परीक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन जैन आणि उपप्राचार्य  उषा जैन यांनी केले. पोस्टर स्पर्धांमध्ये, सर्जनशीलता आणि नाविन्याला महत्त्व दिले जाते. पोस्टरवर दिलेल्या विचारांचे स्पष्ट आणि प्रभावीपणे संप्रेषण होणे आवश्यक आहे.

स्पर्धेचे आयोजन डिप्लोमा विभागप्रमुख.स्मिता शेटे ,सहप्राध्यापक,श्वेता काळे ,सहप्राध्यापक.वैष्णवी लोखंडे ,प्राध्यापक भारती कुचे , प्राध्यापक गायत्री राऊत, प्राध्यापक  सोनाली राठोड यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here