शहाजीबापू पाटलांनी भर सभेत थोबाडीत मारून घेतली..

0

पंढरपुर : लोकसभा निवडणुकीमध्ये पाणी देणाऱ्या खासदाराला आमच्या जनतेने निवडून दिले नाही. पाणी आडवणाऱ्या व्यक्तीला खासदार म्हणून पाठवले. ही जनतेची माणूस म्हणून चूक झाली आहे.
याबद्दल माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भर सभेत स्वतःला थोबाडीत मारून घेतली. सांगोला मतदारसंघ हा माढा लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघात रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाल्याचे शल्य आजही माजी आमदार शहाजी पाटील यांच्या मनात असल्याचे दिसते. याच बाबत पाणी प्रश्नावर शहाजी बापूंनी स्वतःला थोबाडीत मारून घेतली.

सांगोला मतदारसंघाला आजपर्यंत कुणी दिला नाही इतका सर्वाधिक निधी शिवसेनेचा आमदार असतानाही मला देवेंद्र फडणवीस यांनी दिला. त्यामुळे आपण भाजपचे उपकार कधी विसरणार नाही. आपले संपूर्ण आयुष्य भाजपसाठी तळमळ करत राहील, असे विधान माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here