सिन्नर प्रतिनिधी : पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात मुलांच्या कल्पनेतून मडकी सिंचन योजना साकारली . नुकताच उन्हाचा कहर वाढू लागला पायाला चटके बसू लागले आहे. यातूनच बाल मनात वरील कल्पना साकारली. आपल्या घरी मागील वर्षात अक्षय तृतिया सणाला आणलेल्या मडक्यांचा उपयोग करून आपल्या शाळेतील प्रांगणात असणाऱ्या कोवळ्या झाडांची तहान भागविण्याची योजना विद्यार्थ्यांच्या चिमुकल्या मनात आली . विद्यार्थ्यांच्या या संकल्पनेला बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेला मूर्त स्वरूप मिळाले.
“मुलांनी भुकेल्यास अन्न व तहानलेल्यास पाणी” या उक्तीचा सार्थ उपयोग करू या टाकाऊतून टिकाऊ बनवू या . याचा उपयोग केला व एक अनोखा उपक्रम राबवून झाडांना पाणी व चिमण्या पाखरांची तहानेची भूक भागविली.या उपक्रमामुळे मडक्यात टाकलेल्या पाण्याचा योग्य उपयोग होऊन उन्हाळ्यात झाडांना मोठे जीवदान मिळणार आहे.विद्यार्थी आपल्या उरलेल्या पाण्याचा उपयोग झाडांसाठी करतात.
या उपक्रमासाठी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक टी.के.रेवगडे, बी.आर.चव्हाण, आर.व्ही.निकम, एस.एम. कोटकर,आर.टी.गिरी. एम.एम.शेख,सविता देशमुख,सी.बी.शिंदे, के.डी.गांगुर्डे, एस.डी. पाटोळे, आर.एस.ढोली,ए.बी.थोरे उपस्थित होते