जामखेड तालुका प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी नगर रोडच्या कामाबद्दल केलेल्या तक्रारीची दखल …. ताबडतोब काम चालू करून ३० एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण करून देणार असे आश्वासन देशमुख अँड कंपनी टेंभुर्णी चे प्रोजेक्ट व्यवस्थापक सुरज पुरी यांनी सांगितले . कोठारी पेट्रोल पंप ते चिचपुर पर्यंत चा राहिलेला रोड पंधरा दिवसात करणार अशी माहिती सुरज पुरी प्रोजेक्ट व्यवस्थापक ( इंजिनिअर )यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी दिली
गेल्या बऱ्याच दिवसापासून कोठारी पेट्रोल पंप चिंचपूर पर्यंत नगर रोड काम अपूर्ण राहिले आहे रोडचे काम बरेच अपूर्ण राहिल्यामुळे बरेच अपघात झालेले आहेत यामध्ये बऱ्याच जणांचे हात पाय मोडलेले आहेत सदर अपघाताबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी वेळोवेळी तक्रार केली असता या रोडचे इंजिनिअर सुरज पुरी यांनी पंधरा दिवसाच्या आत संपूर्ण काम करून देणार असे आश्वासन सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिले आहे दिले आहे