Rishabh pant lost temper on poor fielding after defeated from pbks lucknow super giants vs punjab kings IPL 2025 | “मला खूप…” पंजाबकडून पराभव झाल्यानंतर पंतने कोणाला ठरवले जबाबदार? प्लेऑफमध्ये पोहोचण्याबद्दल सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट

0


Rishabh Pant Reaction After Loss: रविवारी आयपीएल 2025 (IPL 2025) मधील पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हा सामना खेळवला गेला. या सामन्यात पंजाब किंग्जने लखनऊ सुपर जायंट्सचा 37 धावांनी पराभव केला. या पराभवानंतर लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतने संताप व्यक्त केला. यासोबतच, त्याने संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याबाबत एक मोठे विधानही केले. पंजाबने दिलेल्या 237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊच्या फलंदाजांना फक्त 199 धावा करता आल्या. या हंगामात लखनऊ हा सहावा पराभव आहे. हा संघ 10 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे.

कोणाला ठरवले जबाबदार?

सामना संपल्यावर पंतने पराभवाबद्दल खुलासा केला. या पराभवासाठी ऋषभ पंतने संघाच्या खराब क्षेत्ररक्षणाला जबाबदार धरले. सामन्यानंतर तो म्हणाला, “नक्कीच खूप जास्त धावा झाल्या. जेव्हा तुम्ही चुकीच्या वेळी महत्त्वाचे झेल सोडता तेव्हा तुम्हाला खूप त्रास होतो. आम्हाला वाटले की त्यामुळे जास्त नुकसान झाले. सुरुवातीला आम्ही योग्य लेन्थ निवडली नाही. हा खेळाचा एक भाग आहे.” 

हे ही वाचा: श्रीसंतवर पुन्हा एकदा बंदी! संजू सॅमसनला सपोर्ट करणे पडले महागात, झाली मोठी कारवाई

 

फलंदाजीबाबत काय म्हणाला पंत?  

पंत संघाच्या फलंदाजीबद्दल म्हणाला की, “जेव्हा तुमचा वरची फळी खरोखर चांगली फलंदाजी करत असेल तेव्हा हे समजून येते. तुम्ही त्यांच्याकडून प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा करू शकत नाही. हा खेळाचा एक भाग आहे. ते दरवेळी आमच्यासाठी हे काम करू शकत नाहीत. तुम्ही आधी म्हटल्याप्रमाणे, आम्हाला खूप धावा करायच्या होत्या. यामुळे आमचे खूप नुकसान झाले.”

हे ही वाचा: बायकोच्या वाढदिवशी ‘या’ अभिनेत्रीचा फोटो लाईक करणे विराट कोहलीला पडले महागात, द्यावे लागले स्पष्टीकरण

 

पंतने प्लेऑफबद्दल केले मोठे विधान 

पंतने लखनऊ सुपर जायंट्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांबद्दलही विधान केले. तो म्हणाला, ‘हे स्वप्न अजूनही जिवंत आहे. जर आम्ही पुढचे तीन सामने जिंकलो तर आम्ही निश्चितच ते करू शकतो”  पंतच्या संघाचे उर्वरित तीन सामने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्ससोबत आहेत. या तिन्ही संघांपैकी कोणत्याही संघाकडून लखनऊ सुपर जायंट्सला सहज विजय मिळणार नाही.




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here