येवला प्रतिनिधी : पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या वतीने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र उध्वस्त करीत भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या या कारवाई मध्ये भारतीय लष्करातील जे जवान शहीद झाले त्यांना नमन करून तसेच भारतीय सैन्याचे मनोबल वाढावे म्हणुन येवला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे मानवंदना करून तिरंगा रॅली काढण्यात आली.
हुतात्मा स्मारक येवला येथे शहीद जवानांना व अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अतिरेक्यांचे अतिक्रमण परतवून दहशतवाद्यांना कंठस्थान घालणाऱ्या भारतीय लष्कराने अत्यंत गर्वाचे काम केले. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या हल्ल्यानाही अपयशी ठरवत भारतीय लष्कराच्या पाठिंब्या करिता शहीद जवानांना नमन करण्याकरिता अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली वाहण्याकरिता या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जय जवान जय किसान, वंदे मातरम्, भारतीय जवानाचा विजय असो या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, तालुकाध्यक्ष ॲड.समीर देशमुख, प्रीतम पटणी, अशोकराव भागवत, दिनकर दाणे, माधव सोळसे, माधवराव देशपांडे, डॉ.मसरतअली शहा, युवक शहराध्यक्ष नाना शिंदे, अजिज शेख, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष महेंद्र पगारे, गणपतराव शिंदे, दत्तात्रय लोणारी, रामजी निकम, भाऊसाहेब आहिरे, बापूसाहेब खटाणे, विजय घोडेराव, चांगदेव शिंदे, बाळू गायकवाड, पीयूष थोरात, शिवेंद्रदित्य देशमुख आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.