डाँ.तनपुरे कामगाराच्या देणी देण्याबाबत तीनही मंडळाकडून ठोस निर्णय नाही.

0

शेतकरी विकास मंडळाचे राजू शेटे यांनी राहुरी ‘त्या’ नेत्याला ‘जयकांत शिक्रे’ची दिली उपमा

unnamed (2).jpg

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

डाँ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे थकीत १३५ कोटी रुपये  निवडणूकीत उतरलेल्या मंडळांनी कशी देणार हे कामगार मेळाव्यात येवून जाहिर करण्याचे आवाहन केले होते.तिनही मंडळाच्या प्रमुख नेत्यांनी कामगारांची देणी देण्या बाबत बांधील असल्याचे आश्वासना व्यक्तीरीक्त ठोस असा निर्णय दिला नसल्याने संचालक मंडळाच्या निवडणूकी नंतर लगेच कामगारांची देणी मिळतील हि अशा आता धुसूर झाली आहे. शेतकरी मंडळाचे राजू शेटे यांनी तनपुरे यांचा नामल्लेख न करता सिंघम चित्रपटातील खलनायक जयकांत शिक्रे यांची उपमा देवून त्याच्या दहशतीमुळे विकास खुंटला होता.तसाच राहुरीचा विकास राहुरीतील जयकांत शिक्रे मुळे विकास खुंटला आहे.

         डाँ.तनपुरे कारखाना कामगारांच्या वतीने बुधवार दि.२१ रोजी कारखाना कार्यस्थळावरील लक्ष्मीनारायण मंदिराच्या प्रांगणात कामगार मेळावा आयोजित केला होता.या मेळाव्यात सुरवातीला कामगारांनी थकीत देणी संदर्भात तीव्र भावणा व्यक्त केल्या.या मेळाव्यास जनसेवा मंडळाचे अरुण तनपुरे,शेतकरी मंडळाचे राजू शेटे,कारखाना बचाव कृती समितीचे अमृत धुमाळ, अँड अजित काळे, पंढरीनाथ पवार दिलीप इंगळे,संजय पोटे,सुधाकर शिंदे,सुखदेव मुसमाडे आदींनी हजेरी लावली.

       

कामगार मेळाव्यात पारंभी जनसेवा मंडळाचे अरुण तनपुरे यांनी कामगारांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून कामगार मेळाव्यात कामगारांचे १३५ कोटी रुपये कसे देण्यात येतील हे जाहिर करण्यासाठी आले होते.देणी देण्या बाबत ठोस असा निर्णय न सांगता. तनपुरे घराणे कामगारांच्या पाठीशी कायम उभे आहे.पुर्ण क्षमतेने कारखाना चालविला.कारभारात काटकसर केल्यास कामगारांची देणी देता येतील असे जाहिर केले.कोणी काही सांगत असले तरी कारखाना सुरु करण्याची जबाबदारी माझी राहील.त्यासाठी सभासद कामगार यांनी विश्वास दाखविणे गरजेचे आहे.असे जनसेवा मंडळाचे अरुण तनपुरे यांनी सांगितले.

            कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने अँड अजित काळे यांनी कारखाना चालू करणे महत्वाचे कारखाना चालू झाला.तरच कामगारांची देणी देता येतील.एकाच वेळी कामगारांची देणी देणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले असले.तरी ऊस तोडणी कामगार उचल वसूल करण्यासाठी न्यालयात दावे दाखल केलेले आहे.हे दावे चांगल्या रितीने चालवले तर जवळपास १२० कोटी रुपये वसूल होतील यातून कामगारांची देणी देणे शक्य होईल.कारखाना पुर्ण क्षमतेने चालविला पाहिजे.पाच वर्षात कामगारांची सर्व देणी दिली जातील.

             

शेतकरी मंडळाचे राजू शेटे यांनी कामगार मेळाव्यात येवून कामगारांची देणी देण्या संदर्भात कामगारांसमोर आपली भुमिका विशद केली.माजी खा.सुजय विखे व आ.शिवाजीराव कर्डीले यांच्या बरोबर लोकसभा व विधानसभेच्या निवडणूकीत दिलेल्या शब्दाप्रमाणे विखे व कर्डीले यांनी निवडणूकीतून माघार घेतली आहे.माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री भारत गोगावले हे कारखाना चालू करण्या संदर्भात सहकार्य करणार आहेत.तनपुरे यांचा नामउल्लेख न करता टिका करताना शेटे म्हणाले की, ‘सिंघम’ चित्रपटातील जयकांत शिक्रे यांने त्याच्या परिसरातील मालमत्ता स्वतः विकत घेवून दहशत निर्माण केली.तसाच प्रकार राहुरीत घडत आहे. राहुरीतील जयकांत शिक्रे यांच्यामुळे तालूक्यातील विकास खुंटला आहे.अशी टिका राजू शेटे यांनी केली आहे.

                कामगार मेळाव्यात तिनही मंडळाची भुमिका समजावून घेतल्या नंतर कामगार संघटनेचे सचिव सचिन काळे यांनी सांगितले की,कामगारांची दोन तीन दिवसात पुन्हा बैठक घेवून कोणत्या मंडळाला पाठींबा द्यायचा सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल. या मेळाव्यास अर्जन दुशिंग, गजानन निमसे,सचिन काळे, इंद्रभान पेरणे, सिताराम नालकर, बाळासाहेब तारडे, ईश्वर दुधे, नामदेव धसाळ, राजू सांगळे, अविनाश गायके आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here