अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने “छात्र गौरव” कार्यक्रमाचे आयोजन…
कोपरगाव प्रतिनिधी : भविष्य हे आपोआप घडत नसते. ते जिद्द, मेहनत आणि पालकांशी समन्वय ठेवून योग्य दिशा घेत घडवायचे असते. असा मार्गदर्शन शिक्षणतज्ञ विजय बनकर यांनी एक कार्यक्रमात केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोपरगांव शाखेच्या वतीने इयत्ता १० वी, १२ वी गुणवत्ता विद्यार्थी यांच्या “छात्र गौरव” कार्यक्रमाचे आयोजन कोपरगांव विद्यार्थी सहाय्यक सभागृहात करण्यात आले होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शक म्हणून शिक्षणतज्ञ विजय बनकर, कोपरगांव वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.मनोहर येवले, स्वच्छतादूत सुशांत घोडके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बनकर पुढे म्हणाले, लाकडाचा ओंडका प्रवाहाच्या दिशेने वाहत जातो. त्याला कोणत्या किनाऱ्यावर न्यायचे हे प्रवाह ठरवतो. मात्र जिवंत माणूस हा प्रसंगी झटपट किनाऱ्यावर जाण्यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहोतो. आपल्याला पुढील वाटचालीत योग्य दिशा समजून घ्यावी लागेल. तुम्ही जे करत आहात त्यात तुम्ही समाधानी असल्याची स्वतः खात्री करा. भविष्यासाठी स्वतःला घडवायचे आहे हे ध्येय बाळगण्याचे शेवटी आवाहन केले.
या प्रसंगी कोपरगांव वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.मनोहर येवले यांनी शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या हक्काचे कायदे विषयक माहिती सांगितली. स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी गुणवंत विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी उपस्थित गुणवंत विद्यार्थी यांनी पाहुण्यांशी शैक्षणिक क्षेत्र आणि भविष्यातील वाटचाल या विषयावर मुक्त संवाद साधला. कार्यक्रमास स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विचारमंच, महाराष्ट्र प्रांत, शाखा : कोपरगांव , धर्मयोद्धा माजी खासदार ॲड. कै. भिमराव (नाना) बडदे स्मृती प्रतिष्ठान, महाराष्ट्र प्रांत, शाखा : कोपरगांव यांचे सहकार्य लाभले.
प्रारंभी उपस्थित पाहुण्यांचे शुभहस्ते सरस्वती, स्वामी विवेकानंद प्रतिमा पुजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थी यांना प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देवून गौरवण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शहर मंत्री विशाल होन, तालुका संयोजक विजय पगारे ,सह संयोजक हेमंत सुर्यवंशी , प्रदेश कार्यकारणीचे रवि मोकाशे, प्रीतम कापसे ,ॲड. ज्ञानदेव खेडकर, अभिषेक ठावरे , राहुल पाटील,श्रेया शिरोडे, अजय शेंडकर, स्वराज खरात यांचेसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक रवि मोकाशे यांनी केले. सुत्रसंचालन श्रेया शिरोडे यांनी केले. सामुदायिक वंदेमातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.