नाशिक प्रतिनिधी : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे यांची विधानपरिषदेच्या रोजगार हमी समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल एस बी देशमुख ;सचिव, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे आणि नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना पा. देशमुख म्हणाले की रोजगार हमी योजना (मनरेगा) ही ग्रामीण भागातील लोकांच्या रोजगारासाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेमुळे, लोकांना रोजगार मिळतो, आमदार किशोर भाऊंच्या कर्तव्यदक्ष, अभ्यासू नेतृत्वाचा तसेच ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली असल्याने नक्कीच लोकहिताचे निर्णय घेऊन सामाजिक सुरक्षा आणि पंचायत राज संस्था बळकट होण्यास मदत होणार आहे. भाऊंच्या शैक्षणीक क्षेत्रातील योगदाना बरोबरच सामाजिक, गरजू,लोकांना निश्चितपणे फार फायदा होईल आणि मोलाचे सहकार्य लाभेल यामध्ये शंका नाही.भाऊंच्या या नव्या नियुक्ती साठी व पुढील कार्यासाठी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाकडून शुभेच्छा देण्यात आल्या /