मुख्याध्यापक संघाच्या वतीने एस बी देशमुख यांचा सेवापुर्ती सत्कार संपन्न

0

सिन्नर प्रतिनिधी : मुख्याध्यापक संघाच्या वतीने एस बी देशमुख यांचा सेवापुर्ती सत्कार संपन्न झाला . सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघ, सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि शिक्षण विभाग पंचायत समिती  सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने सहविचार सभा संपन्न व सत्कार समारंभ संपन्न झाला . तालुका मुख्याध्यापक संघ, पंचायत समिती शिक्षण विभाग सिन्नर आणि सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सिन्नर येथे सिन्नर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांसाठी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेचे अध्यक्षपद शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. बागुल यांनी भूषवले.

*सभेचा प्रारंभ व चर्चा*

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व जिल्हा मुख्याध्यापक संघांचे सचिव  एस. बी. देशमुख  यांनी केले. त्यांनी प्रमुख पाहुण्यांचे महत्त्व विशद केले. व आपल्या गेल्या २२ वर्ष मुख्याध्यापक अध्यक्ष पदावरून संघटनात्मक केलेले काम व तालुक्यातील मुख्याध्यापकांनी दिलेली साथ याचा लेखा जोखा मांडला ,यावेळी डॉ. एम एस .बागुल  यांनी शासकीय योजनांबाबत तसेच समाज कल्याण शिष्यवृत्ती यांची माहिती सांगितली आणि महत्त्वाच्या विषय समित्यांबाबत सखोल चर्चा केली. सभेत उपस्थित सर्व मुख्याध्यापकांना योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

महात्मा फुले शिक्षण संस्थेचे सचिव श्री. नामदेव लोणारे , सहसचिव श्री. रामनाथ बलक , शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. बागुल , सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक येथील डॉ. धवल चोक्सी , डॉ. समीर फुटाणे , तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. बी. देशमुख , महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य  एम. एन. देशमुख , राहुल वरंदळ , एम .डी . काळे , आशिष गायकवाड  यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.

डॉ. धवल चोक्सी  यांनी ‘हेल्थ इज वेल्थ’ या विषयावर मार्गदर्शन करताना 20% व्यायाम आणि 80% योग्य आहाराचे महत्त्व अधोरेखित केले. दुसरे अतिथी डॉ. समीर फुटाणे  यांनी पाठीच्या कण्याचे महत्त्व आणि स्नायूंची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी योगा आणि स्विमिंगच्या नियमित सरावावर भर देत निरोगी शरीराचे महत्त्व पटवून दिले. नामदेव लोणारे आणि रामनाथ बलक साहेब यांनी डॉ. चोक्सी साहेब आणि डॉ. फुटाणे साहेब यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. एम .डी .काळे  यांनीही आरोग्याच्या काळजीबाबत सर्वांना मार्गदर्शन केले.

या सभेचा विशेष क्षण म्हणजे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांच्या 32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्तीचा सत्कार. त्यांच्या कार्याचा गौरव करताना एम . डी . काळे  यांनी “त्यांचे कार्य न भूतो न भविष्यती” आहे आणि त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,” असे उद्गार काढले. तालुका मुख्याध्यापक संघ, सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. धवल चोक्सी , डॉ. समीर फुटाणे . डॉ. बागुल  आणि इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बुके, शाल, लेखणी आणि प्रतिमा देऊन देशमुख सर यांचा सत्कार केला.

*कार्यक्रमाचा समारोप*

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सविता काठे  यांनी केले, तर आभार प्रदर्शन एल. डी. बेणके, मुख्याध्यापक, गोपाल विद्यालय, पिंपळे यांनी मानले. अध्यक्षांच्या परवानगीने ‘आरोग्याचा जागर’ या कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम सिन्नर तालुक्यातील मुख्याध्यापकांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here